Header Ads

घड्याळात वाजले एक मराठी कविता | Ghadyalat Vajale Ek Marathi Kavita


नमस्कार, या पोस्टमध्ये आपण घड्याळात वाजले एक ही मराठी कविता बघणार आहोत. लहान मुलांची अभ्यास न करण्याबद्दलची कारण सांगणारी ही मजेशीर कविता आहे. मी लहान असताना हे गाणं म्हणून आम्ही खूप एन्जॉय करायचो. मला खात्री आहे तुम्ही पण आपल्या लहानपणी कधी ना कधीही कविता नक्की ऐकली असेल.

⏰⏰घड्याळात वाजले एक 

मराठी कविता ⏰⏰

घड्याळात वाजले एक, आईने केला केक 🍰
केक खाण्यात एक तास गेला 😋
मी नाही अभ्यास केला... 📒📝😉

घड्याळात वाजले दोन, आजीचा आला फोन ☎
फोनवर बोलण्यात एक तास गेला😄
मी नाही अभ्यास केला... 📒😉

घड्याळात वाजले तीन, हरवली माझी पिन,🔗
तीन शोधण्यात एक तास गेला 🔎
मी नाही अभ्यास केला..  📒😉

घड्याळात वाजले चार, आईने दिला मार,🙌
मार खाण्यात एक तास गेला😝
मी नाही अभ्यास केला..  📒📝😉

घड्याळात वाजले पाच, ताईने केला नाच, 💃
नाच बघण्यात एक तास गेला 😚😚
मी नाही अभ्यास केला..  📒😉

घड्याळात वाजले सहा, आईने केला चहा ☕
चहा पिण्यात एक तास गेला 😍😍
मी नाही अभ्यास केला..  📒📖😉

घड्याळात वाजले सात, आईने केला भात 🍚
भात जेवण्यात एक तास गेला 😋😋
मी नाही अभ्यास केला...  📒😉

घड्याळात वाजले आठ, दादानी फोडला माठ🎃
खापर उचलण्यात एक तास गेला😑
मी नाही अभ्यास केला..  📒📝😉

घड्याळात वाजले नऊ, पळाली आमची माऊ
माऊला शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला..  📒😉

घड्याळात वाजले दहा, बाबा आले पहा, 💂
बाबांशी बोलण्यात एक तास गेला😊😦
मी नाही अभ्यास केला..  📒📖📝😉

घड्याळात वाजले अकरा, मी मारल्या चकरा 💁💁
चकरा मारण्यात एक तास गेला 
मी नाही अभ्यास केला..  📒📖📝😉

घड्याळात वाजले बारा, आईचा चढला पारा 😠
गुपचूप मी झोपून गेले 😴😴
मी नाही अभ्यास केला.. 📒😉

✜ ✜ ✜ ✜


हे पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज आपण या पोस्टमध्ये घड्याळात वाजले एक मराठी कविता बघितली.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.