शेपटीवाल्या प्राण्यांची भरली सभा Lyrics🐒🐹 Shepativalya Pranyanchi Bharali Sabha
नमस्कार या पोस्टमध्ये आपण शेपटीवाल्या प्राण्यांची भरली सभा Lyrics बघणार आहोत.
__________________
🐬🐒शेपटीवाल्या प्राण्यांची भरली सभा Lyrics 🐯🐹
शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा
पोपट होता सभापती मधोमध उभा... || धृ ||
पोपट म्हणाला, ..(*२)
मित्रांनो देवाघरची लूट
तुम्हा आम्हा सर्वांना एक एक शेपूट
या शब्दाचे कराल काय
गाय म्हणाली,.. (*२)
अशा शेपटीने मी मारील माशा
घोडा म्हणाला, ... (*२)
याला धरीन त्याला धरीन
माझ्या शेपटीने असं करीन तसं करीन
कुत्रा म्हणाला, .... (*२)
कुशीत येईल तेव्हा शेपूट हलवत राहीन
मांजरी म्हणाली..(*२)
नाही ग बाई कुत्र्यासारखे
माझे मुळीच नाही
खूप खूप रागवीन तेव्हा
शेपूट फूगवीन
खार म्हणाली...(*२)
पडेल थंडी जेव्हा माझ्या
शेपटीची बंडी
माकड म्हणाले,..(*२)
कधी वर कधी खाली
शेपटीवर मी मारीन उडी
मासा म्हणाला,..(*२)
शेपूट म्हणजे दोन हात
पोहत राहीन प्रवाहात...
कांगारू म्हणाले,..(*२)
माझे काय तुझे काय
शेपूट म्हणजे पाचवा पाय
मोर म्हणाला,..(*२)
पिस पिस फुलवून धरीन मी धरीन
पावसाळ्यात नाच मी करीन
पोपट म्हणाला,..(*२)
छान छान छान छान
देवाच्या देणगीचा ठेवा मान
अमूल्य शेपटीचा उपयोग करा
नाहीतर काय होईल ?....
दोन पायांच्या माणसागत
आपलं शेपूट झडून जाईल
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
- मुंगीबाई मुंगीबाई बालगीत Lyrics
- मी पप्पाचा ढापून फोन Lyrics
- वटाणा फुटाणा शेंगदाणा कविता
- इथे इथे बस रे काऊ
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण शेपटीवाल्या प्राण्यांची भरली सभा Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment