रुसू बाई रुसू कोपऱ्यात बसू बालगीत Lyrics 👩 Marathi Baalgeet
नमस्कार या पोस्टमध्ये आपण रुसू बाई रुसू कोपऱ्यात बसू बालगीत Lyrics बघणार आहोत.
____________________
👩रुसू बाई रुसू कोपऱ्यात बसू बालगीत Lyrics 👩
रूसू बाई रुसू कोपऱ्यात बसू
चिमुकल्या चेहऱ्यावर हरवलय हसू
इवलीशी पावल गप्प गप्प झाली
मोठी दोन भावांना मनवायला आली..
दादा आला बघा गाल फुगवून
डोळे मिचकावत जीभ फिरवून
हि हि हि करतोय जोकर बनून
पण छोटी बघतेय नाक मुरडून
ताईने आणले बाबांचे चष्मे
डोक्यावर टोपी आणि करतेय नखरे
मोठा चष्मा घालून नाचते कशी...
तरी रुसली आपली आहे तशीच्या तशी..
रूसू बाई रुसू कोपऱ्यात बसू
चिमुकल्या चेहऱ्यावर हरवलय हसू
इवलीशी पावल गप्प गप्प झाली
मोठी दोन भावांना मनवायला आली..
दादाने मग आणला एक माऊ ससा
ताई म्हणाली छोटी आता तरी हसा
सशाचे कान बघा कसे छान
छोटीला पाहून डोलवतो मान
खळखळून हसली चिमुकली कळी
गालावर पडली गोड गोड खळी
आनंदाने छोटी ने मारली मग मिठी
संपली हो कट्टी....
रूसू बाई रुसू कोपऱ्यात बसू
चिमुकल्या चेहऱ्यावर हरवलय हसू
संपली हो कट्टी..
दादा ताई सोबत
झाली आता गट्टी..
____________________
✔ ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇
- अट्टू आणि गट्टू फिरायला चालले बालगीत Lyrics
- मुंगीबाई मुंगीबाई बालगीत Lyrics
- रोज रोज करून नुस्तीच शाळा Lyrics
____________________
तर आज या पोस्टमध्ये आपण रुसू बाई रुसू कोपऱ्यात बसू बालगीत Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
____________________
Post a Comment