अट्टू आणि गट्टू फिरायला चालले बालगीत Lyrics | Attu Ani Gattu Firayala Chalale
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये अट्टू आणि गट्टू फिरायला चालले बालगीत Lyrics बघणार आहोत.
__________________
👬अट्टू आणि गट्टू फिरायला चालले👬
फिरायला चालले...
फिरायला चालले...
अट्टू आणि गट्टू फिरायला चालले
फिरायला चालले...
फिरायला चालले...
जाता जाता चालले जंगलातून
जंगलात दिसली छोटीशी झुडुपं
छोट्याशा वेली मोठ्ठी झाड..
जंगलात दिसली छोटीशी झुडुपं
छोट्याशा वेली मोठ्ठी झाड..
झाडावर चढता येईचना...
झाडावर चढता येईचना...
जंगलात दिसली छोटीशी टेकडी
छोटासा डोंगर मोठ्ठा पर्वत
जंगलात दिसली छोटीशी टेकडी
छोटासा डोंगर मोठ्ठा पर्वत
पर्वतावर चढता येईचना..
पर्वतावर चढता येईचना..
जंगलात दिसला छोटस तळं
छोटासा ओढा मोठ्ठी नदी...
जंगलात दिसला छोटस तळं
छोटासा ओढा मोठ्ठी नदी...
पाण्यात पोहता येईचना...
पाण्यात पोहता येईचना...
जंगलात दिसले छोटेसे पक्षी
छोटीशी हरण मोठ्ठा हत्ती
जंगलात दिसले छोटेसे पक्षी
छोटीशी हरण मोठ्ठा हत्ती
हत्तीवर बसता येईचना....
हत्तीवर बसता येईचना....
जंगलात ऐकली कोल्ह्याची कोल्हेकुई
वाघाची डरकाळी सिंहाची गर्जना
जंगलात ऐकली कोल्ह्याची कोल्हेकुई
वाघाची डरकाळी सिंहाची गर्जना
भीतीने पळता येईचना...
अट्टू आणि गट्टू फारच भ्याले
रडायला लागले पळायला लागले
अट्टू आणि गट्टू फारच भ्याले
रडायला लागले पळायला लागले
घराची वाट काही सापडेचना...
तिकडून आले घोडे दादा
टप टप घोडे दादा
अट्टू आणि गट्टू हसायला लागले
हसायला लागले हसायला लागले
टप टप चालले घोडेस्वार
टप टप चालले घोडेस्वार
टप टप चालले घोडेस्वार
🎈🎈🎈🎈
________________
हि बालगीते पण नक्क्की वाचा 👇👇👇
________________
________________
Post a Comment