पैंजण येडूच्या पायाच भक्ती गीत Lyrics | Yedabai Geet Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण येडूच्या पायाच पैंजण भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.
_____________________
पैंजण येडूच्या पायाच भक्ती गीत Lyrics | Marathi
कशाचं काय बाई घेऊन बसलात
गोडीनं गायाच....
मला बनून राहू वाटत पैजण येडूच्या पायाचं
येडूच्या पायाचं...|| धृ ||
जसं की राही घुंगराला बाई घुंगरू जोडून
तसंच राहू वाटतं तुझ्या पायात पडून
चैती पुनवला पालखीत बसून संगच जायाचं
मला बनून राहू वाटत पैजण येडूच्या पायाचं
येडूच्या पायाचं...|| १ ||
चांदीचे तोड मासोळ जोड सोन्याचे शिंपण
हिरा झळकतो पैंजणी तसाच नशीब चमकल
ठरवलं मी आता जिंदगीभर तुझ्या पायात राहायचं
ए मला बनून राहू वाटत पैजण येडूच्या पायाचं
येडूच्या पायाचं...|| २ ||
सुखात न्हाईन फुलात राहीन किती मी डौलात
घरोघरी माय होईल दर्शन तुझ्याच पावलात
महेश विष्णू चंदनानी गुण तुझच गायाचं
मला बनून राहू वाटत पैजण येडूच्या पायाचं
येडूच्या पायाचं...|| ३||
___________________
ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
- कुठवर पाहू तुझी वाट येडू Lyrics
- जागा कर येडू माझा कुंकाचा धनी Lyrics
- हातावर पडली आली माझ्या नशिबाला Lyrics
___________________
👀आज या पोस्टमध्ये आपण पैंजण येडूच्या पायाच भक्ती गीत Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!!
___________________
Post a Comment