-->

Header Ads

कृष्ण माझा छान गवळण Lyrics | Krushn Majha Gavlan Chan Gavlan



नमस्कार या पोस्टमध्ये आपण कृष्ण माझा छान गवळण Lyrics बघणार आहोत.

_____________________

कृष्ण माझा छान गवळण Lyrics

कृष्ण माझा छान पायी वाजती पैंजण
दूर कुठे गेला बाई तो खेळायला
कुणीतरी जागा त्याला आणायला...|| धृ ||

यमुनेच्या काठी तो खेळत होता
गाई गुरे तो चारत होता
गोपाळाचा मेळा तो कृष्ण सावळा
दूर कुठे गेला बाई तो खेळायला
कुणीतरी जागा त्याला आणायला...|| १ ||

जा तुम्ही होते मथुरे बाजारी
पाठी पाठी मागं येईल श्रीहरी
अवघड वाट त्या मथुरेचा घाट
नाही ग तो माठ बाई ग फोडायला
दूर कुठे गेला बाई तो खेळायला
कुणीतरी जागा त्याला आणायला...|| २ ||

एका जनार्दनी कुंजबिहारी
सजली सारी गोकुळ नगरी
गोड गोड पावा तुम्ही वाजवुनी दावा
सुरू करा मधुर बासरी वाजवायला
दूर कुठे गेला बाई तो खेळायला
कुणीतरी जागा त्याला आणायला...|| ३ ||

_____________________


✅हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇

_____________________

तर आज या पोस्ट यामध्ये आपण कृष्ण माझा छान गवळण Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

_____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents