मोठी झाल्यावर मी कोण होणार बालगीत Lyrics 👩 Marathi Baalgeet
नमस्कार या पोस्टमध्ये आपण मोठी झाल्यावर मी कोण होणार बालगीत Lyrics बघणार आहोत.
__________________
👩मोठी झाल्यावर मी कोण होणार बालगीत Lyrics 👩
छान कपडे घालून मी पाहते
मोठी झाल्यावर मी कोण बरं होते ?
वेगवेगळी रूपे मी आता घेणार
काय काय बनून मी दाखवणार ??
पांढरा कोट माझा डॉक्टर मी बनेन
सर्वांचे आजार पळवून लावेन
गोड गोड औषध मीच देणार
हसून सर्वांना बरं करणार
पोलीस ताई बनून राहील मी ताठ
पळणाऱ्या चोरांची धरीन मी पाठ
न घाबरता मी पुढे जाणार
माझ्या शहराला सुरक्षित ठेवणार
शेतकरी बनून शेतात मी जाईन
सर्वांसाठी धान्य खूप खूप पिकविन
ट्रॅक्टर माझा वेगात धावणार
सर्वांना मीच खाऊ घालणार
शिक्षिका बनून शाळेत जाणार
छोट्या मुलांना मी शिकवणार
छान छान गोष्टी छान छान गाणी
माझी मुले होतील खूप शहाणी
पायलट बनून विमानात बसणार
निळ्या आकाशात उंच उडणार
ढगांचा पार माझी भरारी
विमानाची सफर असेल भारी
वकील ताई बनवून काळा कोट घालीन
खऱ्याच्या बाजूने नेहमी मी बोलीन
सर्वांची मदत करायला मी तयार
अशी मी आहे मी आहे मुलगी खूप हुशार
डॉक्टर पोलीस शेतकरी छान
पायलट वकील शिक्षिकेचा मान
अशी माझी स्वप्न खूप खूप छान
मोठी होऊन मी बनेन महान...
__________________
✅ ही बाल गीते पण नक्की वाचा👇👇👇
- ट्रिंग ट्रिंग फोन माकडाने उचलला बालगीत Lyrics
- रानातले पक्षी जमले एकत्र बालगीत Lyrics
- वटाणा फुटाणा शेंगदाणा कविता
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण मोठी झाल्यावर मी कोण होणार बालगीत Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment