-->

Header Ads

गवतफुला कविता इंदिरा संत | Gavatfula Kavita - Indira Sant



नमस्कार या पोस्टमध्ये आपण गवतफुला कविता बघणार आहोत. इंदिरा संत यांची ही कविता आहे.

__________________

🌸गवतफुला कविता इंदिरा संत🌸

रंग रंगुल्या सान सानुल्या
गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला
सांग तुझा रे तुझा लळा !

मित्रांसंगे माळावरती
पतंग उडवीत फिरताना
तुला पाहिले गवतावरती
झुलता झुलता हसताना
विसरून गेलो पतंग नभीचा
विसरून गेलो मित्राला
पाहून तुजला हरखून गेलो
अशा तुझ्या रे रंग कळा !!

हिरवी नाजूक रेशीम पाती
दोन बाजूला सळसळती
निळनिळूनी एक पाकळी
पराग पिवळे झगमगती
तळी पुन्हा अन् गोजिरवाणी
लाल पाकळी खुलती रे
उन्हामध्ये हे रंग पाहता
भान हरपुनी गेले रे !!

वारा घेऊन रूप सानुले
खेळ खेळतो झोपाळा
रात्र ही इवली होऊन म्हणते
अंगाई चे गीत तुला
मलाही वाटे लहान होऊ
तुझ्याहूनही लहान रे
तुझ्या संगती सदा रहावे
विसरूनी शाळा घर सारे !!

तुझी गोजिरी शिकून भाषा
गोष्टी तुजला सांगाव्या
तुझे शिकावे खेळ आणखी
जादू तुजला शिकवाव्या
आभाळाशी हट्ट करावा
खाऊ खावा तुझ्या सवे
तुझे घालुनी रंगीत कपडे
फुलपाखरा फसवावे !!

रंग रंगुल्या सान सानुल्या
गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला
सांग तुझा रे तुझा लळा !

__________________


✅या कविता पण नक्की वाचा👇👇👇


__________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण गवतफुला कविता इंदिरा संत बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents