वाटेवर झोपडी लुक लुक दिवा बडबड गीत Lyrics | Vatevar Zopadi Luk Luk Diva Baalgeet
नमस्कार या पोस्टमध्ये आपण वाटेवर झोपडी लुक लुक दिवा बडबड गीत Lyrics बघणार आहोत.
___________________
⛺वाटेवर झोपडी लुक लुक दिवा बडबड गीत Lyrics ⛺
वाटेवर झोपडी लुक लुक दिवा...(*२)
आमच्या गावचा पाटील बरा...(*२)
बसायला खुर्ची देतो म्हणाला...(*२)
मला कशाला म्हातारीला ??...(*२)
या बया... या बया...
वाटेवर झोपडी लुक लुक दिवा...(*२)
आमच्या गावचा सुतार बरा...(*२)
बसायला पाट देतो म्हणाला...(*२)
मला कशाला म्हातारीला ??...(*२)
या बया... या बया..
वाटेवर झोपडी लुक लुक दिवा...(*२)
आमच्या गावचा सोनार बरा...(*२)
नाकातली नथनी देतो म्हणाला ...(*२)
मला कशाला म्हातारीला ??...(*२)
या बया... या बया...
वाटेवर झोपडी लुक लुक दिवा...(*२)
आमच्या गावचा कुंभार बरा...(*२)
पाण्याला माठ देतो म्हणाला...(*२)
मला कशाला म्हातारीला ??...(*२)
या बया... या बया...
वाटेवर झोपडी लुक लुक दिवा...(*२)
आमच्या गावचा शिक्षक बरा...(*२)
वही न पेन देतो म्हणाला...(*२)
मला बी यायाचं शिकायला...(*२)
या बया... या बया...
वाटेवर झोपडी लुक लुक दिवा
वाटेवर झोपडी लुक लुक दिवा
वाटेवर झोपडी लुक लुक दिवा
___________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
___________________
👀आज या पोस्टमध्ये आपण वाटेवर झोपडी लुक लुक दिवा बडबड गीत Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!
___________________
Post a Comment