चला ग साऱ्या जाऊ मायाक्का देवीला Lyrics | Chala Ga Sarya Jau Mayakkala Devilaa
नमस्कार या पोस्टमध्ये आपण चला ग साऱ्या जाऊ मायाक्का देवीला Lyrics बघणार आहोत.
__________________
🌸चला ग साऱ्या जाऊ मायाक्का देवीला Lyrics 🌸
चिंचलीला मायक्का ला...
चला साऱ्या ग जाऊ मायाक्का देवीला..(*२) || धृ ||
वर्षाच्या वारीला जाऊया जत्रेला
डोळ्यानं पाहूया कानड्या लाडीला
ओटी भरुया ग..साडी चोळी घेऊन या ग तीला
भंडारा उधळूया चांगभलं बोलूया..
लागूया तिच्या चरणाला
न्हाऊ चला ग हळ ओढाला...
चला साऱ्या ग जाऊ मायाक्का देवीला..(*२) || १ ||
मन माझे त्यांना माझे नटले ग फुलले ग
मायाक्काच्या दर्शनाचे वेड मला लागले ग
अर्ध नारेश्वरी विष्णुरूपिणी ग माया
आदेश ते रूप माऊली ते स्वरूप
पुजुया मायाक्का देवीला
भंडारा लेऊया कपाळीला..
चला साऱ्या ग जाऊ मायाक्का देवीला..(*२) || २ ||
कारंडी लाडी माझी मायाक्का सत्वाची
दूध वाहे ओढ्यातून तशी ती शक्तीची
पुरणपोळीचा नैवेद्य देवीला देऊ
लाखोच्या घोड्याला पाहू पाहू दूत डेऱ्याला
ओवाळू तिच्या पालखीला
सोहळा हा चाले चिचली गावाला
चला साऱ्या ग जाऊ मायाक्का देवीला..(*२) || ३ ||
चिंचलीला मायक्का ला...
चला साऱ्या ग जाऊ मायाक्का देवीला..(*२) ||
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment