-->

Header Ads

अ अ आई Song Lyrics | TreeshaThosar | Shivanya Borade | A A Aai



नमस्कार या पोस्टमध्ये आपण अ अ आई Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - अ अ आई
लिरिक्स - मनीष अंसुरकर
सिंगर -  पलाक्षी दीक्षित, लारीसा रॉक अल्मिडा


__________________

👩अ अ आई Song Lyrics | Marathi 👩


आई...आ आ आई..
ए आई... आ आ आई..

तू किती किती साऱ्यांसाठी करते
खरं खरं सांगते आई घर
तुझ्यामुळेच चालते
आई...आ आ आई..

थकली असशील दमली असशील
घे जरा rest बस इथे तुझ्यासाठी करते चहा
करते best.. माझ्या इतकी नाही तरी copy paste
माझ्या हातच्या जेवणाची आज घेणा test...
आई...आ आ आई..

सर्वांच्या आवडीचा तू menu बनवते
आज आई तुझ्या आवडीचं ग बनवते
आई...आ आ आई..

तू किती किती साऱ्यांसाठी करते
खरं खरं सांगते आई घर
तुझ्यामुळेच चालते
आई...आ आ आई..

विचारते कोणी आई कुठे काय करते ?
आई शिवाय घरामध्ये पान नाही हालते
पान नाही हालते....
आई सारं काही.. आई सर्व काही...
आई विना घराला घरपण नाही...
आई अग आई..

तू किती किती साऱ्यांसाठी करते
खरं खरं सांगते आई घर
तुझ्यामुळेच चालते
आई...आ आ आई..

सर्वात आधी उठून तरी सर्वात नंतर झोपते
सावरते घराला ही घरपण जगते
दुखले खुपले जरा लागले कुठेही तरी
नकळत येते आई ग..
फुंकर घालते आई दुधावरची साय ग
आई सारं काही.. आई सर्व काही..
आई विना घराला घरपण नाही..
आई...आ आ आई..

बनायचे strong मला तुझ्यासारखे आई
तुझ्यासारखी super women व्हायचे आई
रोज शिकविते नेहमी नको कधी रडू
दुसऱ्याच्या मदतीला मागे नको पडू
बरे नसते कोणा तेव्हा रात्रभर जागे
उशाला बसून सेवा करते सर्वांची
आई तू नसताना जग सारे सुने
सोडून मला कधी जाऊ नको कुठे
एक आई आ आ आई...

तू नीज माझ्या बाळा
नको होऊ इतक्यात मोठी
परी देवा घरची खरी तू
दुनिया आहे त्यात खोटी
रहा अशी निरागस
तू अल्लड अवखळ बाळा
रोवून पाय मातीत उड उंच उंच आभाळा..
मनातून ठेव हळवे

बन निडर होऊन कणखर तू
हृदयात ओल ठेवून हो
मायेचा पाझर तू...
गर्दीत माणसांच्या जपशील कशी स्वतःला
भरवू नकोस देऊ कधीही माझ्या बाळा..
आहेस तशीच राहा तू..
धिटूकली बाहुली छोटी..
परी देवा घरची खरी तू
नको होऊ इतक्यात मोठी..

तू नीज माझ्या बाळा
नको होऊ इतक्यात मोठी

__________________


✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇

__________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण अ अ आई Song Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents