गाऊया दत्त दत्त वदनी भक्ती गीत Lyrics | Datta Bhajan Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण गाऊया दत्त दत्त वदनी भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.
__________________
गाऊया दत्त दत्त वदनी भक्ती गीत Lyrics
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
गाऊया दत्त दत्त वदनी..(*२)
तया वाचून कोण विसावा मनूजाला त्रिभुवनी
गाऊ या दत्त दत्त वदनी...(*३)
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||...|| धृ ||
त्रैमूर्ती हा दत्त दिगंबर
भस्मांकित तनु सतेज सुंदर
नमती सुरवर ऋषीमुनी भावे
आळवीती निशदिनी हो
गाऊ या दत्त दत्त वदनी...(*३)
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||...|| १ ||
मंगलमय हे नाम गुरुचे
सदैव ज्याच्या अधरी नाचे
भय त्या कसले मरण कशाचे ?
नाम अमृत सेवनी हो
गाऊ या दत्त दत्त वदनी...(*३)
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||...|| २ ||
दत्त दिगंबर मधुर चंद्रमा
चकोर बनुनी सेवू सुष्मा
वारकरी आम्ही अमरापुरीचे
नाचूया रंगानी हो....
गाऊ या दत्त दत्त वदनी...(*३)
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||...|| 3 ||
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
- दत्त घ्यावा दत्त गावा अभंग Lyrics
- झुले पाळणा रे बाळा अनुसया गाते Lyrics
- तीन शिरे एक मान दत्ता तुला कोणी दिले वरदान Lyrics
- दत्ता अवधूता तुझे रे मला वेड लागले Lyrics
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण गाऊया दत्त दत्त वदनी भक्ती गीत Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment