झुले पाळणा रे बाळा अनुसया गाते Lyrics | Jhule Palna Re Bala Anusaya Gate
नमस्कार या पोस्टमध्ये आपण झुले पाळणा रे बाळा अनुसया गाते Lyrics बघणार आहोत.
_________________________
🌹झुले पाळणा रे बाळा अनुसया गाते Lyrics 🌹
झुले पाळणा रे बाळा अनुसया गाते
ब्रम्हा विष्णू महेशाला आज जोजविते.. || धृ ||
तीन ऋषी ब्रह्मतेज घेऊन ठाकले
रूपा आड त्यांनी माझे सत्व परीक्षले
वस्त्र नको तनु वरी भोजन वाढिते
झुले पाळणा रे बाळा अनुसया गाते.. || १ ||
तेजस सतीचे जागले बाळ रूप केले
तीन ऋषी ब्रह्मा विष्णू महेश रे झाले
सान बाळा पुढे माय माऊली हासते
झुले पाळणा रे बाळा अनुसया गाते.. || २ ||
एका पाळण्यात आता मूर्ती तीन गोड
जणू वैराग्याला आता वाचल्याची ओढ
हातावरी जणू माझ्या विश्व आंदोळते
झुले पाळणा रे बाळा अनुसया गाते.. || ३ ||
* * * * *
_________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- तुझ्या नावाचा गजर चहुदीशी गर्जला Lyrics
- दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे Lyrics
- अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्तगुरु Lyrics
- तीन शिरे एक मान दत्ता तुला कोणी दिले वरदान Lyrics
_________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण झुले पाळणा रे बाळा अनुसया गाते Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!
_________________________
Post a Comment