पिवळ्या साडीला हिरवी किनार ग भजन Lyrics | Devi Bhajn Marathi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण पिवळ्या साडीला हिरवी किनार ग भजन Lyrics बघणार आहोत.
______________________
🌸पिवळ्या साडीला हिरवी किनार ग भजन Lyrics🌸
पिवळ्या साडीला हिरवी किनार ग
माझ्या आईच्या गळ्यात नवरत्नाचा हार ग.. || धृ ||
भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला
आई गेली रांजणगावाला
गणपतीला वाहिला आईने दुर्वाचा हार ग
माझ्या आईच्या गळ्यात नवरत्नाचा हार ग.. || 1||
पंधरवडीच्या एकादशीला
आई गेली पंढरपुराला
विठ्ठलाला वाहिला आईने तुळशीचा हार ग
माझ्या आईच्या गळ्यात नवरत्नाचा हार ग.. || 2 ||
श्रावण महिन्याच्या सोमवाराला
आई गेली कैलासाला
शंकराला वाहिला आईने बेलाचा हार ग
माझ्या आईच्या गळ्यात नवरत्नाचा हार ग.. || 3 ||
______________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- रडू नको बाळा मी जोगव्याला जाते Lyrics
- रडू नको बाळा अंबा घराला येते Lyrics
- माझी अंबा ग देवी अंबा ग Lyrics
______________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण पिवळ्या साडीला हिरवी किनार ग भजन Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
______________________
Post a Comment