-->

Header Ads

तीर्थरूप बाबा माझे तीर्थरूप आई भक्ती गीत Lyrics | Vithal Bhaktigeet Marathi



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये तीर्थरूप बाबा माझे तीर्थरूप आई भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.
_____________________

🌸तीर्थरूप बाबा माझे तीर्थरूप आई भक्ती गीत Lyrics🌸

पोथी पुराण ग्रंथ हे सारे
देती मजला ग्वाही
आई बापाच्या माये वाचूनी
कुणी कुणाचं नाही रे नाही
तीर्थरूप बाबा माझे तीर्थरूप आई || धृ ||

दुनियाच्या बाजारात तीर्थात आनि रोसात
आई बापाची ही माया नाही हो गणगोतात
स्वार्थ साधू हे सगळे सोयरे
दिसतात ठाई ठाई
आई बापाच्या माये वाचूनी
कुणी कुणाचं नाही रे नाही
तीर्थरूप बाबा माझे तीर्थरूप आई || १ ||

भाऊ बहीण काकू काका
ते मित्र राम शाम
मतलबी ही दुनिया सारी
सारे कामापुरते मामा
धनाचा वाटा घेण्यासाठी
भेटतील लवलाही
आई बापाच्या माये वाचूनी
कुणी कुणाचं नाही रे नाही
तीर्थरूप बाबा माझे तीर्थरूप आई || २ ||

पहिले तीर्थ तमाम
ते राम आणि घनश्याम
सेवा करीता आई बापाची
घडतील चारीधाम....
स्वप्नाची सत्य बोल हे
अंतरी जाणून घेई
आई बापाच्या माये वाचूनी
कुणी कुणाचं नाही रे नाही
तीर्थरूप बाबा माझे तीर्थरूप आई || ३ ||

पोथी पुराण ग्रंथ हे सारे
देती मजला ग्वाही
आई बापाच्या माये वाचूनी
कुणी कुणाचं नाही रे नाही
तीर्थरूप बाबा माझे तीर्थरूप आई ||
_____________________


✅हि गीते पण नक्की वाचा👇👇👇

_____________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण तीर्थरूप बाबा माझे तीर्थरूप आई भक्ती गीत Lyrics बघितल्या. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

_____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents