-->

Header Ads

विठ्ठला तू मम हृदयात भक्ती गीत Lyrics | ithal Bhaktigeet Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण विठ्ठला तू मम हृदयात भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.
________________

🌸विठ्ठला तू मम हृदयात भक्ती गीत Lyrics 🌸

विठ्ठला तू मम हृदयात
दुःखाच्या या संसारात
माझे म्हणू कुणाला
दुःख हे माझ्या मनाला...|| धृ ||

धन लोभी हे सखे सोयरे सारे भाऊबंद
सतधर्माचा सत्कार याचा नाही कुणाला छंद
अविचारी क्षणोक्षणाला
फसविती भोळ्या मनाला
विठ्ठला तू मम हृदयात
दुःखाच्या या संसारात
माझे म्हणू कुणाला
दुःख हे माझ्या मनाला...|| १ ||

माझे माझे म्हणून ज्यांना
आजवर जवळी केले
संकट समय जिवलग सारे
दूर दूर पळून गेले
नाही उरली सीमा अवगुणाला
नाही किंमत इथे सद्गुणाला
विठ्ठला तू मम हृदयात
दुःखाच्या या संसारात
माझे म्हणू कुणाला
दुःख हे माझ्या मनाला...|| २ ||

या विश्वाचा तो विधाता
साऱ्या जगाचा तू स्वामी
सद्बुद्धी दे या सर्वांना
देवा तू अंतर्यामी
विसरले हे तुझ्या ऋणाला
जडले हे सोपानाला
विठ्ठला तू मम हृदयात
दुःखाच्या या संसारात
माझे म्हणू कुणाला
दुःख हे माझ्या मनाला...|| ३ ||

____________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
____________________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण विठ्ठला तू मम हृदयात भक्ती गीत Lyrics बघितले‌.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!

____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.