-->

Header Ads

गजानन बाबाच्या भजनात कोण कोण Lyrics | Gajanan Maharaj Bhajan



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये गजानन बाबाच्या भजनात कोण कोण Lyrics बघणार आहोत.

________________

गजानन बाबाच्या भजनात कोण कोण Lyrics | Marathi

टाळी वाजवा ना वाजवा ना खणखण
गजानन बाबाच्या भजनात कोण कोण ? ... || धृ ||

टाळ घेतला घेतला हातात
माय बापाच्या देखत
टाळी वाजवा ना वाजवा ना खणखण
गजानन बाबाच्या भजनात कोण कोण ? ... || 1 ||

विना घेतला हातात
सासू-सासर्‍यांच्या देखत
टाळी वाजवा ना वाजवा ना खणखण
गजानन बाबाच्या भजनात कोण कोण ? ... || 2 ||

मृदुंग घेतला हातात
जाऊ भासऱ्यांच्या देखत
टाळी वाजवा ना वाजवा ना खणखण
गजानन बाबाच्या भजनात कोण कोण ? ... || 3 ||

चिपळ्या घेतल्या हातात
ननंद दीराच्या देखत
टाळी वाजवा ना वाजवा ना खणखण
गजानन बाबाच्या भजनात कोण कोण ? ... || 4 ||

हेर घेतला घेतला पायात
फुगडी खेळते पतीच्या सोबत
टाळी वाजवा ना वाजवा ना खणखण
गजानन बाबाच्या भजनात कोण कोण ? ... || 5 ||

____________________


✅हि गीते पण नक्की वाचा👇👇👇
____________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण गजानन बाबाच्या भजनात कोण कोण Lyrics बघितल्या. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents