गण गण गणात बाबांनी मंत्र दिला Lyrics | GanGanat Bote Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण गण गण गणात बाबांनी मंत्र दिला Lyrics बघणार आहोत.
_______________________________
गण गण गणात बाबांनी मंत्र दिला Lyrics
गण गण गणात गण गण गणात
बाबांनी मंत्र दिला ग
मला बाई लहानपणात || धृ ||
बाबाच्या मेळ्यात पेरला गहू
साधु संत घाला हो जेऊ
गण गण गणात गण गण गणात ... ||१ ||
बाबांच्या मळ्यात पेरली ज्वारी
साधु संत येती हो घरी
गण गण गणात गण गण गणात ... || २ ||
बाबांच्या मळ्यात पेरला कपाशी
मी धरली एकादशी
गण गण गणात गण गण गणात ... || ३ ||
बाबांच्या मळ्यात पेरला ऊस
साधुसंत पितात रस
गण गण गणात गण गण गणात ... || ४ ||
बाबांच्या मळ्यात पेरली बाजरी
नैवेद्याला पिठलं भाकरी
गण गण गणात गण गण गणात ... || ५ ||
बाबांच्या मळ्यात पेरला मका
वैकुंठाला गेले तुका
गण गण गणात गण गण गणात ... || ६ ||
* * * * * * *
_________________________
___________________________
तर आज या पोस्टमध्ये आपण गण गण गणात बाबांनी मंत्र दिला Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!
______________________________
Post a Comment