Header Ads

Gajanan Maharaj Bhajan Marathi Lyrics | गजानन महाराज भजन लिरिक्स


नमस्कार, या पोस्टमध्ये तुम्हाला Gajanan Maharaj Bhajan Marathi Lyrics वाचायला मिळतील. मराठी भाषेमधून इथे आपण बघणार आहोत.

    Gajanan Maharaj Bhajan Marathi Lyrics

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    1. जय गजानन श्री गजानन

    जय गजानन श्री गजानन किमया ही दाखवी
    जय गजानन श्री गजानन किमया ही दाखवी

    तुझ्या कृपेने झाडाला फूटू दे पालवी
    तुझ्या कृपेने झाडाला फूटू दे पालवी
    गण गण गणात बोते ... (4 times )

    वस्त्रहरण चालले सतीचे, हसली गौरव सभा
    वस्त्रे पुरवून लाज राखली, कृष्ण सखा तू उभा
    कृष्ण सखा तू उभा ...
    गण गण गणात बोते ... (4 times )

    प्रल्हादाने हाक मारिता विष्णू अवतरले
    नरसिंहाचे रुप घेऊनी स्तंभी गुरगुरले,
    स्तंभी गुरगुरले .....
    गण गण गणात बोते ... (4 times )

    ध्रुव बाळाला अढळ पदाने चिरंजीव केले
    गाथा ही तारली तुक्याला वैकुंठा नेले
    वैकुंठा नेले ....
    गण गण गणात बोते ... (4 times )

    जय गजानन श्री गजानन किमया ही दाखवी
    जय गजानन श्री गजानन किमया ही दाखवी
    तुझ्या कृपेने झाडाला फूटू दे पालवी
    तुझ्या कृपेने झाडाला फूटू दे पालवी
    फूटू दे पालवी. ... (3 times )

    गण गण गणात बोते ... (7 times )

     ‑ ‑ ‑ ‑ ⸎⸎⸎⸎⸎  ‑ ‑ ‑ ‑ 


    2. चला हो जाऊ शेगावी 

    चला हो जाऊ शेगावी, चला हो जाऊ शेगावी
    गजानन संत नमनासी, फिटे नवभ्रांतीची भीती
    फिटे नवभ्रांतीची भीती

    लाभते दर्शने एका मशी
    चला हो जाऊ शेगावी,
    गजानन संत नमनासी
    जय गजानन श्री गजानन
    जय गजानन श्री गजानन

    दिगंबर रूप हे त्याचे नसे मुळी भान देहाचे
    समाधी ध्यान हे त्याचे
    समाधी ध्यान हे त्याचे अखंडित अंतरंगासी
    चला हो जाऊ शेगावी,गजानन संत नमनासी
    जय गजानन श्री गजानन
    जय गजानन श्री गजानन

    जशी ज्याची असे भक्ती दे त्याला तशी शक्ती
    जशी ज्याची असे भक्ती दे त्याला तशी शक्ती
    जशी ज्याची असे भक्ती दे त्याला तशी शक्ती
    मुमुक्षु देत विरक्ती ... मुमुक्षु देत विरक्ती ...
    गावी खेळ त्यास अनिलासी
    चला हो जाऊ शेगावी,गजानन संत नमनासी
    जय गजानन श्री गजानन
    जय गजानन श्री गजानन

    कृपा होता तुटे व्याधी, परमाथ या संधी
    कृपा होता तुटे व्याधी, परमाथ या संधी
    म्हणे तुकड्या चला आधी, संत हा देव अविनाशी
    चला हो जाऊ शेगावी,गजानन संत नमनासी
    जय गजानन श्री गजानन
    जय गजानन श्री गजानन

    - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

     ‑ ‑ ‑ ‑ ⸎⸎⸎⸎⸎  ‑ ‑ ‑ ‑ 


    3. मनाने ध्यास हा धरिला

    मनाने ध्यास हा धरिला ...मनाने ध्यास हा धरिला
    चला शेगावी बघण्याला
    अवलिया संत नांदतसे.. अवलिया संत नांदतसे
    गजानन म्हणती जन याला
    मनाने ध्यास हा धरिला ...मनाने ध्यास हा धरिला

    हजारो लोक जाऊनीया समाधी वंदीती भावे
    हजारो लोक जाऊनीया समाधी वंदिती भावे
    पावती भक्तीच्या मागे,,, पावती भक्तीच्या मागे
    आम्हीही जाऊ तरण्याला ...
    मनाने ध्यास हा धरिला ...मनाने ध्यास हा धरिला

    नसे त्या पंत आणि पक्ष नसे, कूणी रंग बेरंग
    सदा अल मस्त ते राहती
    सदा अलमस्त ते राहती
    ब्रह्म स्वरूपात सदनाला
    मनाने ध्यास हा धरिला ...मनाने ध्यास हा धरिला

    आपुले सुखदुःखे ही जाणती संत सहभावे
    आपले सुखदुखी ही जाणती संत सहभावे
    म्हणे तुकड्या शरण गेलो,, म्हणे तुकड्या शरण गेलो
    कृपेने संत तो वळला
    मनाने ध्यास हा धरिला ...मनाने ध्यास हा धरिला

    चला शेगावी बघण्याला.. चला शेगावी बघण्याला
    अवलिया संत नांदतसे.. अवलिया संत नांदतसे
    गजानन म्हणती जन याला
    मनाने ध्यास हा धरिला ...मनाने ध्यास हा धरिला

     ‑ ‑ ‑ ‑ ⸎⸎⸎⸎⸎  ‑ ‑ ‑ ‑ 

    4. आभाळाचा हुंदका

    आभाळाचा हुंदका हा दाटूनिया आला
    आभाळाचा हुंदका हा दाटूनिया आला
    शेगावीचा राणा आज समाधीस्थ झाला
    समाधीस्थ झाला ...

    दहा दिशा झाल्या गोळा बिंदी मागे बिंदी
    निर्वानाच्या दर्शनाला भक्तांच्या या झुंडी
    दहा दिशा झाल्या गोळा बिंदी मागे बिंदी
    निर्वानाच्या दर्शनाला भक्तांच्या या झुंडी

    देवाधिकांनी फुलांचा... देवाधिकांनी फुलांचा वर्षाव केला
    शेगावीचा राणा आज समाधीस्थ झाला
    समाधीस्थ झाला ....

    रथामध्ये देह बैसे निशब्द निवांत
    मोक्ष मार्ग मोकळाहा आत्मा चाले शांत
    रथामध्ये देह बैसे निशब्द निवांत
    मोक्ष मार्ग मोकळाहा आत्मा चाले शांत
    पांगरला अंगावरी ... पांगरला अंगावरी
    परमार्थ शेला ...
    शेगावीचा राणा आज समाधीस्थ झाला
    समाधीस्थ झाला

    जुने वस्त्र टाकी देह नवे परिधान,
    योगी पुरुषाने आत्म्याचा सन्मान
    जुने वस्त्र टाकी देह नवे परिधान,
    योगी पुरुषाने आत्म्याचा सन्मान
    आसवांच्या अमृतात...

    आसवांच्या अमृतात
    सोहळा हा न्हाला ....
    शेगावीचा राणा आज समाधीस्थ झाला
    समाधीस्थ झाला

     ‑ ‑ ‑ ‑ ⸎⸎⸎⸎⸎  ‑ ‑ ‑ ‑ 

    5. नाम घेता गणा गणा

    नाम घेता गणा गणा, धाव बापा गजानना
    नाम घेता गणा गणा, धाव बापा गजानना ....

    विदर्भात या शेगावी भेट तुझी माझी व्हावी
    भोळ्या भाविकांच्या नाथा माय बंधू जना
    विदर्भात या शेगावी भेट तुझी माझी व्हावी
    भोळ्या भाविकांच्या नाथा माय बंधू जना
    भोळ्या भाविकांच्या नाथा माय बंधू जना

    नाम घेता गणा गणा, धाव बापा गजानना
    नाम घेता गणा गणा, धाव बापा गजानना ...

    संकटात माझी नौका तूच एक स्वामी आता
    संकटात माझी नौका तूच एक स्वामी आता
    शिरावरी ठेवा हात दारी आलो दयाघना
    शिरावरी ठेवा हात दारी आलो दयाघना

    नाम घेता गणा गणा, धाव बापा गजानना
    नाम घेता गणा गणा, धाव बापा गजानना ....

    तुझ्याकडे येता येता पुरेपूर थकलो नाथा
    तुझ्याकडे येता येता पुरेपूर थकलो नाथा
    मला कोण वाली आता सोसू कशाने यातना
    मला कोण वाली आता सोसू कशाने यातना

    नाम घेता गणा गणा, धाव बापा गजानना
    नाम घेता गणा गणा, धाव बापा गजानना ....

    दोन शब्द माझे ऐका पुण्य लाभ पदरी टाका
    दोन शब्द माझे ऐका पुण्य लाभ पदरी टाका
    निराशा न व्हावी माझी शरण आम्ही आलो चरणा
    निराशा न व्हावी माझी शरण आम्ही आलो चरणा

    नाम घेता गणा गणा, धाव बापा गजानना
    नाम घेता गणा गणा, धाव बापा गजानना ....

     ‑ ‑ ‑ ‑ ⸎⸎⸎⸎⸎  ‑ ‑ ‑ ‑ 

    6. गुरुरायाची मूर्ती सावळी


    गुरुरायाची मूर्ती सावळी ..गुरुरायाची मूर्ती सावळी ..
    अंतरात माझ्या साठलेली...अंतरात माझ्या साठलेली ...

    गुरुरायाची मूर्ती सावळी ..गुरुरायाची मूर्ती सावळी ..
    अंतरात माझ्या साठलेली...अंतरात माझ्या साठलेली ...

    भक्ती पुष्पांचा साज चढविला
    भक्ती पुष्पांचा साज चढविला

    गजानन देव्हारी बसलेला....
    भक्ती भावे पूजा मी मांडलेली..
    भक्ती भावे पूजा मी मांडलेली ...

    अंतरात माझ्या साठलेली..
    अंतरात माझ्या साठलेली ....
    गुरुरायाची मूर्ती सावळी ...

    दिगंबर गजानन योगी... दिगंबर गजानन योगी
    वेडेपट जरी वरपांगी .. वेडेपट जरी वरपांगी ...
    देई मजला कृपेची सावली ...
    देवी मजला कृपेची सावली ...

    अंतरात माझ्या साठलेली ...
    अंतरात माझ्या साठलेली ...
    गुरुरायाची मूर्ती सावळी ..
    जपता गजानन दिन राती,
    मिळे साधका चीर सुख शांती...
    जपता गजानन दिन राती,

    मिळे साधका चीर सुख शांती...
    कमलासुतास गुरु माऊली
    कमलासुतास गुरुमाऊली

    अंतरात माझ्या साठलेली ...
    अंतरात माझ्या साठलेली ...
    गुरुरायाची मूर्ती सावळी ..
    गुरुरायाची मूर्ती सावळी ..

    अंतरात माझ्या साठलेली ...
    अंतरात माझ्या साठलेली ...
    अंतरात माझ्या साठलेली ...
    अंतरात माझ्या साठलेली ...

     ‑ ‑ ‑ ‑ ⸎⸎⸎⸎⸎  ‑ ‑ ‑ ‑ 

    7. करू पारायण गजानना

    करू पारायण गजानन विजयाचे
    करू पारायण गजानन विजयाचे

    घेऊ आशीर्वाद गजानन बाबाचे
    पारायणाने होईल मन हे पावन
    पारायणाने लाभे मना समाधान
    कळतात अनुभव गुरु भक्तांचे
    करू पारायण गजानन विजयाचे ....(2 times )

    गजानन महाराज की जय हो ...(3 times )

    हे माया मोह प्रपंच नित्याचे सोबती
    गुरुचरणी लाभसी सात्विक शांती
    गजानन चिंतणी ठेविता सन्मती
    जन्मोजन्मीची सारी पाप ही जळती
    नेम नाही येई कधी काळाची स्वारी ...(2 times )
    शब्द शब्द सांगती दास गणू चे
    करू पारायण गजानन विजयाचे ....

    कधी संपत नाही कृपा सद्गुरुची
    जना लागलीसे आस ही गुरुची
    ओम गजाननाय ....
    भजन अर्चना ही गजाननाची करावी सेवा
    नित्य गजाननाची ध्यान धरणी करावे चिंतन
    नाते जुळावे गुरुरायाचे
    करू पारायण गजानन विजयाचे ...

    भक्तांना क्षणोक्षणी गजानन तारी
    गुरु तारी त्याला मग कोण मारी
    करावी शेगावीची श्रद्धेने वारी
    गजानन भुवरी संत साक्षात्कारी
    विनम्र विनवितसे भक्त कमलासूत
    विनम्र विनवितसे भक्त कमलासूत
    दर्शन व्हावे श्री गजाननाचे
    करू पारायण गजानन विजयाचे

    करू पारायण गजानन विजयाचे
    घेऊ आशीर्वाद गजानन बाबाचे
    पारायणाने होईल मन हे पावन
    पारायणाने लाभे मना समाधान
    कळतात अनुभव गुरु भक्तांचे
    करू पारायण गजानन विजयाचे

    गजानन महाराज की जय हो .... ...(6 times )

     ‑ ‑ ‑ ‑ ⸎⸎⸎⸎⸎  ‑ ‑ ‑ ‑ 


    8. मंदिरी कळस बोलला

    मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरा...(2 times)
    शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येती ...(2 times )
    घेती समाधी ऋषिपंचमीला गहिवरला गाभारा
    मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरा...

    भक्तगणांचा मेळा जमला,
    भक्त जन शोकाकूळ झाला ...(2 times)
    भक्त भास्कराने जसे सांगितले त
    सेच रचिले मंदिराला . ...(2 times)
    समाधीत ठेविले मूर्तीला. ...(2 times)

    गहिवरला तो गाभारा
    मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरा...
    शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येती ...(2 times)
    घेती समाधी ऋषिपंचमीला गहिवरला गाभारा
    मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरा...


    संत गजानन दूजे शूकगुनी
    योगेश्वर ते अतिज्ञानी ...(2 times)
    भक्तगणांना ताराया अवतरले जगती अवलिया ...(2 times)
    कमला सूत वंदे श्री चरणी, शेगावी पावन मंदिरा
    मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरा...

    शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येती ...(2 times)
    घेती समाधी ऋषिपंचमीला गहिवरला गाभारा ...(2 times)
    मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरा... ...(2 times)

     ‑ ‑ ‑ ‑ ⸎⸎⸎⸎⸎  ‑ ‑ ‑ ‑ 


    9. आले गुरुराया द्वारी

    आले गुरुराया मी द्वारी, माझे संकट निवारी
    गजानन बाबा, गुरुराया ...(3 times)
    आले गुरुराया मी द्वारी, माझे संकट निवारी
    शेगावच्या गजानना .....

    केली सेवा मी बाबा जीवनभर
    मला तुझाच आधार, आले आता संकट एकाएकी
    कहर होई आता, सोसवेना व्यथा
    गजानन बाबा तुम्ही आता सावरा .....
    मंदिरी आले तुझ्या दे तू जीवदान
    बाबा शरण तुला .... शेगावीच्या गजानना ...(4 times)

    बाबा शरण तुला, दे तू जीवदान
    आले गुरुराया मी द्वारी, माझे संकट निवारी
    आजवरी प्रपंचात विवंचना किती
    सहाय्या मी अशी तुझ्या चिंतनी राहिले निरंतर मी
    आता ना सोसावे संकट हे नवे, गजानना लक्ष द्यावे
    आता मी विनविते, तूच येऊनी आता संकट निवारावे ....
    ऐकावी विनवणी
    शेगावीच्या गजानना ...(4 times)

    कमला सूत विनवी भावे, भक्त दुःख निवारी ...(2 times)
    गजानन बाबा, गुरुराया ...( 3 times)
    आले गुरुराया मी द्वारी, माझे संकट निवारी ...(2 times)
    शेगावीच्या गजानना ...(8 times)

     ‑ ‑ ‑ ‑ ⸎⸎⸎⸎⸎  ‑ ‑ ‑ ‑ 

    10. मोजता येत नाही


    मोजता येत नाही जगाच्या मापानं
    ऐसे वैभव दिले गजानन बाबानं
    मोजता येत नाही जगाच्या मापानं
    ऐसे वैभव दिले गजानन बाबानं

    पेढा नाही, बर्फी नाही, नाही साखर
    गजाननाच्या पुण्याईने मिळे भाकर
    पेढा नाही, बर्फी नाही, नाही साखर
    गजाननाच्या पुण्याईने मिळे भाकर
    झुणका भाकर प्रसाद घ्यावा भक्तांनी ...(2 times)

    ऐसे वैभव दिले गजानन बाबानं
    मोजता येत नाही जगाच्या मापानं
    ऐसे वैभव दिले गजानन बाबानं

    टाळ नाही, विना नाही, नाही मृदुंग
    गजाननाच्या पुण्याई मिळेल सत्संग
    टाळ नाही, विना नाही, नाही मृदुंग
    गजाननाच्या पुण्याई मिळेल सत्संग

    सत्संगाचा लाभ घ्यावा भक्तांनी ...(2 times)
    ऐसे वैभव दिले गजानन बाबानं
    मोजता येत नाही जगाच्या मापानं
    ऐसे वैभव दिले गजानन बाबानं

    झाड नाही झुडूप नाही नाही ग फांदी
    गजाननाच्या पुण्याई मिळेल संधी
    ऐसे वैभव दिले गजानन बाबानं
    मोजता येत नाही जगाच्या मापानं
    ऐसे वैभव दिले गजानन बाबानं

     ‑ ‑ ‑ ‑ ⸎⸎⸎⸎⸎  ‑ ‑ ‑ ‑ 

    11. भक्ती मार्गावरती भेटे

    भक्ती मार्गावरती भेटे, इथे आकाशाशी नाते
    भक्ती मार्गावरती भेटे, इथे आकाशाशी नाते

    जपा मंत्रांचा गण गण गणात बोते,
    गण गण गणात बोते ...

    उभ्या जगाच्या कल्याणा, देव प्रगटला शेगावी ...(2 times)
    निवारण्या विघ्ने व्याधी अनोखी तु दिला दावी ..(2 times)

    श्री गजाननाच्या चरणी ..(2 times)

    धाव घेती अवघी तिर्थे,
    जपा मंत्र हा मंत्रांचा
    गण गण गणात बोते. ...(2 times)

    व्यर्थ नमस्कारासाठी नाही चमत्कार केला ..(2 times)
    पंचभुताचा तो स्वामी अष्ट सिद्धी त्यासे वेला ..(2 times)
    मुखातूनी सद भक्तांच्या ..(2 times)
    सरस्वती सवणे गाते
    जपा मंत्र हा मंत्रांचा
    गण गण गणात बोते. ...(2 times)

    भासे वेंधळा अडाणी परी थोर ब्रह्मज्ञानी ...(2 times)
    महात्म्य इथे शेगावी, तुझे वैकुंठ भूवरी ..(2 times)
    भक्ती गजानन स्वामींची..(2 times) मना दिव्यशक्ती देती ....
    जपा मंत्र हा मंत्रांचा
    गण गण गणात बोते. ...(2 times)

    भक्ती मार्गावरती भेटे, इथे आकाशाशी नाते
    जपा मंत्र हा मंत्रांचा
    गण गण गणात बोते. ...(2 times)
    गण गण गणात बोते. ...( 4 times)

     ‑ ‑ ‑ ‑ ⸎⸎⸎⸎⸎  ‑ ‑ ‑ ‑ 



    हे पण नक्की वाचा 👇👇👇


    आज या पोस्टमध्ये आपण Gajanan Maharaj Bhajan Marathi Lyrics बघितले. अन्य भक्ती आणि मराठी लिरिक्स संबंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ना पुन्हा भेट नक्की द्या.

    ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.