-->

Header Ads

नामदेवा संगे देव जेवू लागला भक्ती गीत Lyrics | Vithal Bhaktigeet Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण नामदेवा संगे देव जेवू लागला भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.

_________________________

🌸नामदेवा संगे देवजेवू लागला भक्ती गीत Lyrics🌸


भक्तांच्या हाकेला हरी धावू लागला
नामदेवा संगे देव जेवू लागला.. || धृ ||

पिता मोळी आणायला गेले घरी आले नाही
नैवेद्य घेऊन राऊळाशी जावे म्हणे आई
मला जावे म्हणे आई...
नैवेद्याचे ताट हाती घेऊ लागला..
नामदेवा संगे देव जेवू लागला.. || १ ||

नामदेव बोले देवा त्या पांडुरंगा
रोज येतो पिता आज काय झाले सांगा
हो काय झाले सांगा....
नामदेवा चरणी माथा ठेवू लागला...
नामदेवा संगे देव जेवू लागला.. || २ ||

नाही शेंबूड लाळ नाही मी अमंगळ
भीमातीरी स्नान केले आहे मी निर्मळ
देवा आहे मी निर्मळ..
भक्तांच्या भक्तीत दंग होऊ लागला...
नामदेवा संगे देव जेवू लागला.. || ३ ||

नाम्याची भक्ती पाहून जाहला तो दंग
मूर्तीतून प्रगट झाला सखा पांडुरंग
तो सखा पांडुरंग..
सोपान दास गुणगान गाऊ लागला..
नामदेवा संगे देव जेवू लागला.. || ४ ||

भक्तांच्या भक्तीत दंग होऊ लागला...
नामदेवा संगे देव जेवू लागला.. (*५)

_________________________


✅ही भक्तिगीते पण नक्की वाचा 👇👇👇

______________________

👀तर आज या पोस्ट यामध्ये आपण नामदेवा संगे देव जेवू लागला भक्ती गीत Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

______________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents