पंढरीच्या राया रे तुला दूष्ट लागली Lyrics | Pandharichya Raya Re Tula Dusht Lagali
नमस्कार या पोस्टमध्ये आपण पंढरीच्या राया रे तुला दूष्ट लागली Lyrics बघणार आहोत.
_____________________________
पंढरीच्या राया रे तुला दूष्ट लागली Lyrics
पंढरीच्या राया रे तुला दृष्ट लागली
ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी
रे देवा भक्त मंडळी... || धृ||
पुंडलिकासाठी देवा येथे आलासी
विटेवरी नीट उभा हात कटेशी
सभा मंडपात उभा गरुड सेवेसी
ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी ..|| १ ||
नाम्या संगे एका ताटी तूच जेवीसी
एक नाथा घरी रे देवा पाणी वाहसी
जनाबाई सूळी देता तिला रक्षीसी
ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी .. || २ ||
सुखामेळा संगे देवा ढोरे ओढीशी
गोऱ्या कुंभाराची देवा मडकी घडवीशी
प्रल्हादाच्यासाठी देवा स्तंभी प्रगटशी
ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी .. || ३ ||
इतूके भक्त मिळूनी तुझी दृष्ट काढिती
प्रपंचाचा वीट येऊन आले पायाशी
रुक्मिणी वरा विनवीतसे तुमच्या चरणासी
ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी ...|| ४ ||
§ § § §
_____________________
- विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला Lyrics
- विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुर्वा Lyrics
- जन्मोजन्मीचा भिकारी देवा आलो तुझ्या दारी Lyrics
- विठ्ठलाचे रूप मंदिरी सुंदर Lyrics
_____________________________
आज या पोस्टमध्ये आपण पंढरीच्या राया रे तुला दूष्ट लागली Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 🙏🙏🙏🙏!!!!!!
_____________________________
Post a Comment