-->

Header Ads

कोट्याच साज Song Lyrics | Adarsh Shinde | कोट्याचं साज



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये कोट्याच साज Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - कोट्याचं साज
लिरिक्स / म्युझिक - ऋषी बी
सिंगर - आदर्श शिंदे
म्युझिक ऑन - विजयाआनंद म्युझिक


___________________

👑कोट्याच साज Song Lyrics | Marathi👑

वादळी या अंधारी लई जुलूम सोसला
पिढ्या पिढ्याचा शाप ज्यानं ज्ञानाने बदलला
घातला घाला घाटनेचा त्यांनी ज्याची सावली
होती घृन होती पुण्य महूच्या मातीत
एक सूर्य असा जन्मला....
बाई कोट्याचं साज आमचं
ताज भीम माझं.....(*४)

तो काळ होता वर्णवादाचा रूढी परंपरेचा
शेकडो वर्षाचा भेदभावाचा अस्पृश्यतेचा
मनुवादाचा भिडला त्याला
एकटा पोरगा हा सुभेदाराचा

ए त्या साऱ्या जातीवादाचा मोडला ज्यानं माज
बाई कोट्याचं साज आमचं
ताज भीम माझं.....
दीनदुबळ्याची हाक काळजात भिम माझं...
बाई कोट्याचं साज आमचं
ताज भीम माझं.....
दीनदुबळ्याची हाक काळजात भिम माझं...


मानवतेची समानतेची लढाई मोठी होती
लढण्यासाठी शिक्षणाचे त्यांनी
एक शस्त्र घेतले हाती
ओ ओ शस्त्राने त्या तोडल्या
जेव्हा असमानतेच्या बेड्या हो...
स्वाभिमानाने जगू लागले....
सगळे ठोकून आपली छाती...
अरे रुबाबात दिमाखात जगतो आम्ही आज
बाई कोट्याचं साज आमचं
ताज भीम माझं.....
दीनदुबळ्याची हाक काळजात भिम माझं...
बाई कोट्याचं साज आमचं
ताज भीम माझं.....
दीनदुबळ्याची हाक काळजात भिम माझं...

स्वतंत्र भारतापुढे एक प्रश्न उभा होता
संविधान भारताचे लिहिणे आहे का कोणी नेता
बुद्धिमत्ता ज्ञानवंत असा थोर तो विद्वान
आला समोर सुटा बुटात एक कलम हातात घेता
त्या घटनेचा शिल्पकार झालं बाप माझं
बाई कोट्याचं साज आमचं
ताज भीम माझं.....
दीनदुबळ्याची हाक काळजात भिम माझं...
बाई कोट्याचं साज आमचं
ताज भीम माझं.....
दीनदुबळ्याची हाक काळजात भिम माझं...

हरली होती माता भगिनी
शूल्लक नव्हते तिला अधिकार
पदरी तिच्या चुलमुलं आणि तिचा संसार
हक्कामध्ये तिच्या उभी होती भिंत या समाजाची
त्या हिंदू कोडाबिलाने केला तिच्या जीवनाचा उद्धार
आज फोडत्या डरकाळी उठवूनी आवाज
बाई कोट्याचं साज आमचं
ताज भीम माझं.....
दीनदुबळ्याची हाक काळजात भिम माझं...
बाई कोट्याचं साज आमचं
ताज भीम माझं.....
दीनदुबळ्याची हाक काळजात भिम माझं..

वाढत होती कारखानदारी
पण कामगारांचे हाल होते
दीड दमडीचा मोल लावून
आम्हा बनवत गुलाम होते
त्या शोषितांच्या काळजात
दडले ते कित्येक सवाल होते

राबत होती महिला जेव्हा तिच्या पोटात बाळ होते
आज त्याचं कामगारांचा बदलला मिजाज
बाई कोट्याचं साज आमचं
ताज भीम माझं.....
दीनदुबळ्याची हाक काळजात भिम माझं...
बाई कोट्याचं साज आमचं
ताज भीम माझं.....
दीनदुबळ्याची हाक काळजात भिम माझं...


* * * * *
____________________

✅हि गीते पण नक्की वाचा👇👇👇
____________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण कोट्याच साज Song Lyrics बघितल्या. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

____________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents