Header Ads

एके दिवशी सूर्योबा खूप लवकर उठला Lyrics🌞Marathi Baalgeet



🙏🙏🙏नमस्कार नित्रांनो आज या पोस्टमधून एके दिवशी सूर्योबा खूप लवकर उठला Lyrics बघणार आहोत.
___________________

🌞एके दिवशी सूर्योबा खूप लवकर उठला Lyrics🌞

एके दिवशी सूर्य उभा खूप लवकर उठला
आजचा त्याचा खास बेत आधीच होता ठरला

आज रविवार म्हणजे माझाच आहे वार
आज मी फक्त म्हणजे फक्त खेळणार !

समुद्रातल्या पाण्यामध्ये डुबकी मारत खेळला
वाळू शिंपले घेऊन त्याने बनवला भारी किल्ला

डोंगरातल्या नदीवर खेळला घसरगुंडी
बर्फात एवढे लोळला तरी वाजली नाही थंडी

गवतातल्या फुलांशी मारल्या खूप गप्पा
तळ्यातल्या मासोबाला हळूच केला धप्पा

दिवसभर मस्ती करून सूर्य व फार दमला
ढगांच्या गर्दीवर अलगद डोळा लागला

ढगोबांनी चांदोबाला हळूच केली खूण
चांदोबा आला आकाशात सूर्योबा गेला झोपून....

___________________


✅हि बालगीते पण नक्की वाचा👇👇👇

___________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण एके दिवशी सूर्योबा खूप लवकर उठला Lyrics बघितला. अधिक माहितीपूर्ण 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

___________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.