सांग ना ग आई बालगीत Lyrics | Sang Na Ga Aai Baalgeeet
नमस्कार या पोस्टमध्ये आपण सांग ना ग आई बालगीत Lyrics बघणार आहोत.
__________________________
👶सांग ना ग आई बालगीत Lyrics 👶
टुणुक टुणुक भोपळ्यात आजी कशी मावली ?
वाघोबाला आजीची भाषा कशी कळली ?
उंदीर, मांजर, माकडाने खीर कशी केली ?
कुठून आणली रवा, साखर चूल कशी मांडली ?
आकाशातला चांदोबा तूप कसा खाईल ?
कुठे मिळतील उत्तर सांग ना ग आई !!!
ग सांग ना ग आई....
इवल्याशा या डोक्याला प्रश्न किती पडलेत..!!!
लपली आहेत उत्तरे कल्पनेच्या दुनियेत...
कल्पनेच्या दुनियेमध्ये क्षणात येत जाता
नको गाडी नको विमान फक्त डोळे मिटा ..!!!
कल्पनेच्या दुनियेत दिसतो चॉकलेटचा बंगला
बोलू लागतो मोठा पर्वत गाऊ लागतो कावळा
सदरा घालतो चांदोबा थंडी वाजता रात्री
उंदीर मामा सिंहाची होते घट्ट मैत्री..
विचार करता वाटतं हे खरं आहे की खोटं
कल्पनेच्या दुनियेत मात्र सगळं शक्य होतं
ग सगळं शक्य होतं...
सगळच शक्य होतं हो.. सगळच शक्य होतं...
* * * * *
__________________________
ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇
___________________________
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
___________________________
Post a Comment