शिव शंकरा आज मला भेटा Lyrics 💖💖 # महाशिवरात्री भजन
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण शिव शंकरा आज मला भेटा Lyrics बघणार आहोत.
____________________
🌸शिव शंकरा आज मला भेटा Lyrics🌸
चालूनी आलो तुझ्या घाटा
पायी मोडलास काटा
सोडूनी दिल्या चारी वाटा
शिव शंकरा आज मला भेटा.... || धृ ||
अंगी भस्म लावलेला
गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा
कपाळी चंद्र रेखालेला
शिव शंकरा आज मला भेटा.... || 1 ||
गंगा ठेवली मस्तकी
रूप अर्धांगी पार्वती
पुढे शोभे गणपती
शिव शंकरा आज मला भेटा.... || 2 ||
नंदी असे वाहनाला
कुंडल शोभे कानाला
हाती डमरू वाजणारा
शिव शंकरा आज मला भेटा.... || 3 ||
शिवदास विनविते आता
दर्शन द्यावे गुरुनाथा
चरणी ठेविला माथा
शिव शंकरा आज मला भेटा.... || 4 ||
* * * * * *
____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- चला पुजू शंभू शिवाला साध्या भोळ्या महादेवाला Lyrics
- आला आला नाचत शंकर भोळा Lyrics
- मोठ्या महादेवा धावून याहो दुखात Lyrics
____________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण शिव शंकरा आज मला भेटा Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
____________________
Post a Comment