Header Ads

उठ उठ माझ्या मुली विठ्ठलाची पालखी आली Lyrics | Vithal Bhajan Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण उठ उठ माझ्या मुली विठ्ठलाची पालखी आली Lyrics बघणार आहोत.
__________________

🌷उठ उठ माझ्या मुली विठ्ठलाची पालखी आली Lyrics 🌷

उठ उठ माझ्या मुली विठ्ठलाची पालखी आली
दण दण वाजे गल्ली विठ्ठलाची पालखी आली..|| धृ ||

चार बाजू चार धपाटे
विठ्ठलाला माझ्या नवलच वाटे
फुगडी खेळ माय बाई
विठ्ठलाची पालखी आली...|| १ ||

सडा सारवन टाकुनी अंगणी
रांगोळी छान घ्या काढुनी
पूजेची करा तयारी..
विठ्ठलाची पालखी आली...|| २ ||

चिरत होती कांदा न भाजी
रुक्मिणी आई माझी आली उपाशी
लवकर पेटवा चुली...
विठ्ठलाची पालखी आली...|| ३ ||

तुकोबा ने गायले अभंग
विठ्ठल माझा झाला दंग
चरणाची घ्या धूळ..
विठ्ठलाची पालखी आली...|| ४ ||

उठ उठ माझ्या मुली विठ्ठलाची पालखी आली
दण दण वाजे गल्ली विठ्ठलाची पालखी आली..||

* * * * * *
________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_______________________

👀आज या पोस्टमध्ये आपण उठ उठ माझ्या मुली विठ्ठलाची पालखी आली Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏 !!!!!!!

_______________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

friztin द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.