Header Ads

हाडामासाचा बंगला बांधिला गवंडी कुठून आणिला भक्तीगीत Lyrics | Marathi Bhajan



नमस्कार या पोस्टमध्ये आपण हाडामासाचा बंगला बांधिला गवंडी कुठून आणिला भक्तीगीत Lyrics बघणार आहोत.
___________________

🌸हाडामासाचा बंगला बांधिला गवंडी कुठून आणिला भक्तीगीत Lyrics 🌸

हाडामासाचा बंगला बांधिला..
गवंडी कुठून आणिला ...|| धृ ||

चार खांबाचा पाया खोदिला...
नाही सिमेंट वाळू लावली त्याला
नाही लोखंड त्याला लाविला
हाडामासाचा बंगला बांधिला..
गवंडी कुठून आणिला ...|| १ ||

हृदयात मंदिर बनविला
आत आत्मा बसविला
जीवा शिवाची जोडी लाविला
हाडामासाचा बंगला बांधिला..
गवंडी कुठून आणिला ...|| २ ||

या देहाला नऊ दरवाजे
नऊ दाराला देवा नाव दिले
दहावा दरवाजा बंद का केला
हाडामासाचा बंगला बांधिला..
गवंडी कुठून आणिला ...|| ३ ||

लिहायला दोन कॅमेरे
चंद्र सूर्य बघती ते तारे
गाडी चालविणारा कोण बसविला
हाडामासाचा बंगला बांधिला..
गवंडी कुठून आणिला ...|| ४ ||

हाडामासाचा बंगला बांधिला..
गवंडी कुठून आणिला ...||

* * * * * *
________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

___________________

👀आज या पोस्टमध्ये आपण हाडामासाचा बंगला बांधिला गवंडी कुठून आणिला भक्तीगीत Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!
___________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

friztin द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.