Header Ads

सजलाय हो देव माझा चांदी सोन्याच्या पालखीत Lyrics | Sai Baba Bhajan Marathi


नमस्कार या पोस्टमध्ये आपण सजलाय हो देव माझा चांदी सोन्याच्या पालखीत Lyrics बघणार आहोत.
_____________________

🌸सजलाय हो देव माझा चांदी सोन्याच्या पालखीत Lyrics 🌸

सजलाय हो देव माझा
चांदी सोन्याच्या पालखीत
हिऱ्या मोत्याचा हार हा...
डोलतोय गळ्यात....
हिऱ्या मोत्याचा हार हा...
डोलतोय गळ्यात....|| धृ ||

मानाची ही पालखी निघाली
आज शिर्डी गावाला
निरोप द्याया बाबांना जनसागर आला
हो पालखी निघाली बाबांची
पालखी निघाली साईंची
सजलाय हो देव माझा
चांदी सोन्याच्या पालखीत .. || १ ||

हो हो हो मान इथे साऱ्यांना
लहान कुणी ना मोठा
गाठी झाली भक्तांची
गजबजल्या साऱ्या वाटा
पालखी निघाली साईंची
पालखी निघाली बाबांची
सजलाय हो देव माझा
चांदी सोन्याच्या पालखीत .. || २ ||

हा सोहळा बघून
डोळ्यात दाटून आलय पाणी
नाचतय कुणी तल्लीन होऊनी
गाती हो कुणी गाणी
पालखी निघाली साईंची
पालखी निघाली बाबांची
सजलाय हो देव माझा
चांदी सोन्याच्या पालखीत .. || ३ ||

साईंच्या या गजरात
दंगुनी नगरी गेली
बाळाने या खांदा देता
एकच गर्जना झाली...
पालखी निघाली साईंची
पालखी निघाली बाबांची
सजलाय हो देव माझा
चांदी सोन्याच्या पालखीत .. || ४ ||

* * * * * *
_____________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

___________________

👀आज या पोस्टमध्ये आपण सजलाय हो देव माझा चांदी सोन्याच्या पालखीत Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!
___________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

friztin द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.