Header Ads

सोन्याची नगरी शिर्डी गावाला Lyrics | साई बाबा भक्ती गीत



नमस्कार या पोस्टमध्ये आपण सोन्याची नगरी शिर्डी गावाला Lyrics बघणार आहोत.

_________________________

🌹सोन्याची नगरी शिर्डी गावाला Lyrics🌹

सोन्याची नगरी शिर्डी गावाला
साईबाबा माझा प्रगट झाला
ओम साई नावाचा गजर केला
न खांद्यावर घेतले साईबाबाला...|| धृ ||

पायी पालखीला येता तुझं दर्शन घेण्याला
तुझं दर्शन घेण्याला...(*२)
तुला बघून रं साई हर्ष वाटतं हृदयाला ..
हर्ष वाटतं हृदयाला..
कसाऱ्याचा गो ये रस्त्याला ..
विसावा घेती शितल छायेला...
ओम साई नावाचा गजर केला
न खांद्यावर घेतले साईबाबाला...|| १ ||

तूच साई माझा देव देतो आधार जीवनाला
देतो आधार जीवनाला.. (*२)
सारी कृपा तुझी रं बाबा सुखी ठेवते भक्ताला..
सुखी ठेवते भक्ताला...
कडुलिंबाचा गोडवा झाला
साई भक्तीचा अमृत प्याला
ओम साई नावाचा गजर केला
न खांद्यावर घेतले साईबाबाला...|| २ ||

तुझी कृपा र साईबाबा सदा पाठीशी आमच्या हाय
सदा पाठीशी आमच्या हाय...(*२)
वेड लागले साई नावाचं आम्हा भीती कशाची नाय..
आम्हा भीती कशाची नाय...(*२)
ओम साई शाम साई राम साई बोला..
हृदयात बसलाय साईनाथ भोला..
ओम साई नावाचा गजर केला
न खांद्यावर घेतले साईबाबाला...|| ३ ||

* * * * * *
_______________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_________________________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण सोन्याची नगरी शिर्डी गावाला Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!
_________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.