लिंबाच्या लिंबोळ्या लिंबाखाली पसरल्या Lyrics | जात्यावरील ओव्या
नमस्कार या पोस्टमध्ये आपण लिंबाच्या लिंबोळ्या लिंबाखाली पसरल्या Lyrics बघणार आहोत.
_______________________
👦लिंबाच्या लिंबोळ्या लिंबाखाली पसरल्या Lyrics👧
लिंबाच्या लिंबोळ्या लिंबाखाली पसरल्या
भावाला झाल्या ग लेकी भाऊ बहिणी विसरला
दळण दळीता दोन डोळा भरून मोती आलं
भाऊ गेला लेकी घरा बहिणीला नाही बोले..
दळण दळीता पाणी आलं दोन डोळा भरून
बंधू च्या आठवणीचा गंगेला आला महापूर
दळण दळीता वाट पाहते भाऊ राया
नाही ग आला भाऊ माझा न्यावया
दळण दळीता कंठ आला माझा दाटून
भाऊ येरे दिनकरा लय दिस झालं भेटून
सावळा बंधू राया कधी पाहीन असं झालं
दिशा मागून दिस गेल्यावर बाई निघून गेलं
काल आला बंधू आज आला भाचा
लावीतो ग माया आत्या माहेराला चला
दिसा मागून दिस गेलं भाऊ नाही तुझी माझी भेट
बहिण भावाची देवा कशी झाली ताटातूट
दळण दळीता धान्य दाणे का ग हासती...
भाऊजी लावे माया मनी दिसते तिच्या पिरती..
बहिण म्हणे भावा घोडं अंगणी सोड...
आधी जावयाला राम राम घाल मग बहिणीशी बोल...
बहिण भाऊ एका भाकरीचा काला
ऐक रे भाऊ राया एका कुशी जन्म झाला
* * * * * *
_______________________
✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
- नारी जन्माची पुण्याई लिरिक्स
- मंगळागौरीची गाणी Lyrics
- लग्नाची आणि हळदीची पारंपारिक गाणी
- वाचा 20+ मोठे उखाणे मराठी मध्ये
_______________________
आज या पोस्टमध्ये आपण लिंबाच्या लिंबोळ्या लिंबाखाली पसरल्या Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏!!!!!!!!
_______________________
Post a Comment