Header Ads

Lagnachi Gani Marathi Lyrics | लग्नाची आणि हळदीची पारंपारिक गाणी


नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण Lagnachi Gani Marathi Lyrics बघणार आहोत. इथे तुम्हाला लग्नाच्या आणि हळदीच्या वेळी म्हटली जाणारी पारंपरिक गाणी वाचायला मिळतील.

    Lagnachi Gani Marathi Lyrics 

    | Marathi

    〰〰💐💐🌟🌟🌟🎺🎺👭 🎺🎺🌟🌟🌟〰〰〰

    (((( 1 ))))

    आया पोकू बाया पोकू
    पोकीन मामा मावश्या .... (4 times )

    तीळ तांदळाने भरल्या माथन्या
    एवढा शिंगार केला मायेच्या राणीया
    आखण जाणे पोखण जाणे
    पोखाण कोण जाणे व

    सोयऱ्या घरची राणी
    मीन पोखऱ्यासाठी आणि व
    बाई बाई नाव घ्या
    बाई बाई नाव घ्या

    * * * *

    (((( 2 ))))

    कच्चा सुताच्या बाजूला
    टाकला देवाच्या दरबारी
    कच्चा सुताच्या बाजूला
    टाकला देवाच्या दरबारी

    राम सोडती वासरं , लक्षिमन धोये गाई ..(2 times)
    सीता माय दूध ताई , या दुधाची पिव्वी साय. .... .(2 times)
    याचा वास स्वर्गी जाय .....(2 times)
    तुमच्या लेका घरी शोभन. ....(2 times)
    स्वर्गीच्या ( पूर्वजांचे नाव ) बा

    तुम्ही येऊनी जाई जा ....(2 times)
    अवघड रायाची चाकरी ....(2 times)
    येन व्हये ना लवकरी ....(2 times)
    बैलगाड्या भी जूप जा ....(2 times)

    बहिणी भाच्या ले आण जा ....(2 times)
    सोबत चालइ घेई जा ....(2 times)
    दुरडी भरली देवता ....(2 times)
    मांडव भरलासे गोता ....(2 times)

    बाहेर निंघ व ( नवरीची/ नवरदेवाची ) माय ....(2 times)
    वयखी घेव तूहय गोत ....(2 times)
    सर्व आलं माहय गोत ....(2 times)
    एक नाही आले (पूर्वजांचे नाव ) बा ....(2 times)

    * * * *

    (((( 3  ))))

    सारवल्या ग भिंती, वर काढला गणपती
    काढला गणपती , वर काढला गणपती
    नवऱ्या मुलाला ग बाई गणगोत किती ?
    गणगोत किती ? बाई गणगोत किती ?

    मांडवाच्या दारी वर काढली स्वस्तिक
    काढली स्वस्तिक, वर काढली स्वस्तिक ...
    काढली स्वस्तिका नवऱ्या मुलाचं कौतिक
    मुलाचं कौतिक , नवऱ्या मुलाचं कौतिक

    शुभ कार्य माझ्या घरी गणराया तुम्ही यावे
    राया तुम्ही यावे, गणराया तुम्ही यावे
    गाडी घुंगराची घेऊन संग शारदेला घ्यावे
    शारदेला घ्यावे, संग शारदेला घ्यावे ...

    वर माईच्या हातात शोभे कुंकवाची वाटी
    कुंकवाची वाटी, शोभे कुंकवाची वाटी
    मुहूर्ताला येण्यासाठी झाली देवतांची दाटी
    देवतांची दाटी, झाली देवतांची दाटी

    मांडवाच्या दारी हळदी कुंकवाचा सडा
    कुंकवाचा सडा, हळदी कुंकवाचा सडा
    तुळजापूरच्या आईला अधी ग मूळ धाडा
    अधी मूळ धाडा, अधी ग मूळ धाडा ...

    मांडवाच्या दारी चिखल कशाचा ग झाला
    कशाचा ग झाला, चिखल कशाचा ग झाला
    कशाचा ग झाला .. नवऱ्या मुलाचा बाप न्हाला
    मुलाचा बाप न्हाला, नवऱ्या मुलाचा बाप न्हाला .....

    मांडवाच्या दारी कोण फिरती गवळण ?
    फिरती गवळण, कोण फिरती गवळण ?
    फिरती गवळण, नवऱ्या मुलाची
    मुलाची माळवण, नवऱ्या मुलाची माळवण

    मांडवाच्या दारी करवल्या वीस तीस
    करवल्या वीस तीस, करवल्या वीस तीस
    सांगते बाई तुला आधी मानाचे खाली बस
    मानाचे खाली बस, आधी मानाचे खाली बस ...

    मांडवाच्या दारी हळदी बाईच वाळवण
    बाईच वाळवण, हळदी बाईच वाळवण
    हळदी बाईच वाळवण, नवऱ्या मुलाला केळवण
    मुलाला केळवण, नवऱ्या मुलाला केळवण ....

    मांडवाच्या दारी दुरडी भरली पानायाची
    भरली पानायाची, दुरडी भरली पानायाची
    भरली पानायाची, चूलती बोलवा मानायची
    बोलवा मानायची, चूलती बोलवा मानायची ...

    मांडवाच्या दारी कोण आहे ग हावशी
    आहे ग हावशी, कोण आहे ग हावशी ?
    आहे ग हावशी, नवऱ्या मुलाची मावशी ..
    मुलाची मावशी .... नवऱ्या मुलाची मावशी ..

    मांडवाच्या दारी... बाजा वाजतो पिरपिर
    वाजतो पिरपिर .... बाजा वाजतो पिरपिर
    वाजतो पिरपिर ... आजी नेसती आजचीर
    नेसती आजचीर .... आजी नेसती आजचीर

    मांडवाच्या दारी कासाराला लई मान
    कासाराला लई मान ... कासाराला लई मान ...
    कासाराला लई मान ... करी लग्नाचं चुडे दान
    लग्नाचं चुडे दान... करी लग्नाचं चुडे दान

    मांडवाच्या दारी उभी आहे ग कवाची
    आहे ग कवाची, उभी आहे ग कवाची
    आहे ग कवाची, वाट पाहते बंधूची ..
    पाहते बंधूची ... वाट पाहते बंधूची ..

    मांडवाच्या दारी, गलबला कशाचा झाला ?
    गलबला बाई झाला... मामाचा टांगा आला ..

    * * * *

    (((( 4  ))))

    जात्या ईश्वरा तुला सुपारी वाहिली
    सावळी मैना माझी नवरी हळद लागली
    सावळी मैना माझी नवरी हळद लागली
    हं हं हं ...... हं हं हं ......

    जात्या ईश्वरा तुला सुपारी चा डाव
    पार्वतीसाठी नवरे झाले ग महादेव.... महादेव
    हं हं हं ...... हं हं हं ......

    जात्या ईश्वरा तीळ तांदळाचा घाणा
    सावळी नवरी माझी मोतीयाचा दाणा
    मोतीयाचा दाणा ...
    हं हं हं ...... हं हं हं ......

    जात्या ईश्वरा तीळ तांदळाचा घोस
    सावळी मैना माझी नवरी मोतीयाचा घोस
    नवरी मोतीयाचा घोस...
    हं हं हं ...... हं हं हं ......

    लग्नाच्या दिवशी नको येऊ तू पावसा
    उरकितो कन्यादान माझ्या मैनाचा मावसा
    माझ्या मैनाचा मावसा
    हं हं हं ...... हं हं हं ......

    मांडवाच्या दारी सई बाई ग बाई ...
    चिखल झाला चिखलाई.. झाला चिखलाई ...
    चिखलाई. .. ..
    न्हाली नवरीची आई ... नवरीची आई ग....
    आई ...
    हं हं हं ...... हं हं हं ......

    मांडवाच्या दारी सईबाई ग बाई
    चिखल कशान झाला .. कशानं गं झाला ...
    झाला ...
    बाप नवरीचा न्हाला ... ग नवरीचा न्हाला ..
    बाई न्हाला ...
    हं हं हं ...... हं हं हं ......

    मांडवाच्या दारी सई बाई ग बाई ...
    बुथली सांडली तेलाची, सांडली तेलाची ..
    तेलाची ...
    नवरीच्या बापाने धुळ मांडली मानाची...
    मानाची ...
    हं हं हं ...... हं हं हं ......

    मांडवाच्या दारी सईबाई ग बाई ....
    रुसला माझा भाया ग भाया ....
    बाई भाया ....
    पडते ग पाया शेवंती संग जाया ..
    संग जाया ...
    हं हं हं ...... हं हं हं ......

    मांडवाच्या दारी सईबाई ग बाई ...
    रुसला माझा दिर ग दिर .,.
    बाई दिर ...
    पडते ग पाया शेवंती संग जाया ...
    सं जाया ....
    हं हं हं ...... हं हं हं ......

    मांडवाच्या दारी सई बाई ग बाई ....
    जावा जावा चा रुसवा... जावाचा रुसवा ....
    रुसवा ...
    हं हं हं ...... हं हं हं ......

    मांडवाच्या दारी सई बाई ग बाई ....
    जाऊ बाई रुसलीस... बाई रुसलीस...
    रुसलीस ..
    भाऊचा पातळ ... मूड घरी नेसतुस ..
    नेसतूस .....
    हं हं हं ...... हं हं हं ......

    मांडवाच्या दारी सई बाई ग बाई ..
    आहेराची सोळा ताट , सोळा ताट
    बाई ताट ...
    भाऊचा पातळ, याचे रुंद रुंद काठ...
    बाई काठ ...
    हं हं हं ...... हं हं हं ......

    मांडवाच्या दारी सईबाई ग बाई ..
    अहिराची ठेला ठेली , ठेला ठेली
    बाई ठेली...
    भाऊचा पातळ मी तर वरचेवर झेली ...
    बाई झेली ....
    हं हं हं ...... हं हं हं ......

    * * * *

    (((( 5 ))))

    पाच पानाचा ग विडा ... वर मोती याचा घोस
    वर मोती याचा घोस ....(2 times)
    पाच पानाचा ग विडा ... वर मोती याचा घोस
    आधी नेमीला गणेश ,
    आधी पूजिला गणेश ...
    आधी पूजिला गणेश .... ....(2 times)

    हळकुंड सुपारी बाई बांधिते जात्याला
    बांधिते जात्याला बाई बांधिते जात्याला ....
    हळकुंड सुपारी बाई बांधिते जात्याला
    मूळ चिट्टी धाडिते ग कुलदेवतेला ....

    जात्या ईश्वरा तुला तांदळाचा घास
    तुला तांदळाचा घास , तुला तांदळाचा घास
    जात्या ईश्वरा तुला तांदळाचा घास
    नवरा मोतीयाचा घोस.... ...(2 times)

    जात्या ईश्वरा तुला सुपारीचा पाया
    तुला सुपारीचा पाया , तुला सुपारीचा पाया
    जात्या ईश्वरा तुला सुपारीचा पाया
    अगं सिता मायी साठी नवरा झालाय रामराया. ...(2 times)

    हळद आणि कुंकू आधी खंडोबा देवाईला
    आधी खंडोबा देवाईला, आधी खंडोबा देवाईला
    हळद आणि कुंकू आधी खंडोबा देवाईला
    मग नवरीच्या बाबा आईला ...(2 times)

    जात्या ईश्वरा तुला सुपारीचा पाला
    तुला सुपारीचा पाला, तुला सुपारीचा पाला
    जात्या ईश्वरा तुला सुपारीचा पाला
    म्हाळसाबाई साठी नवरा झालाय खंडेराया ...(2 times)

    जात्या ईश्वरा तुला सुपारीचा खांब
    तुला सुपारीचा खांब, तुला सुपारीचा खांब
    जात्या ईश्वरा तुला सुपारीचा खांब
    अगं रुक्मिणीच्या साठी नवरा झालाय पांडुरंग
    रुक्मिणीच्या साठी नवरा झालाय पांडुरंग ....

    हळद दळायला ग सवाषिनी कोण कोण ?
    सवाषिनी कोण कोण? सवाषिनी कोण कोण ?
    हळद दळायला ग सवाषिनी कोण कोण ?
    शंकराची पार्वती इठ्ठलाची रुक्मिणी ग ... (2 times)

    हळद बाई आली कोण्या सवाषिनीच्या हाती ?
    कोण्या सवाषिनीच्या हाती ? कोण्या सवाषिनीच्या हाती ?
    हळद बाई आली कोण्या सवाषिनीच्या हाती ?
    दळाया बैसली शंकराची पार्वती .. (2 times)

    हळद दळीते मी खंडेरायाच्या नावाची
    खंडेरायाच्या नावाची, खंडेरायाच्या नावाची
    हळद दळीते मी खंडेरायाच्या नावाची
    आई अंबाबाई आली करवली ग भावाची .. (2 times)

    हळद दळाया मी बसले ग दाटी वाटी
    बसले दाटी वाटी, बसले दाटी वाटी
    हळदी कुंकवाच्या साठी
    बसले दाटी वाटी,हळदी कुंकवाच्या साठी ....

    मांडवाच्या दारी हळदी बाईचं वाळवण
    हळदी बाईचं वाळवण , हळदी बाईचं वाळवण
    मांडवाच्या दारी हळदी बाईचं वाळवण
    नवऱ्या बाळाचं केळवण. .. (2 times)

    लगीन एवढी चिठ्ठी देव बालाजीच्या नावा
    देव बालाजीच्या नावा, देव बालाजीच्या नावा
    मग सोयराच्या गावा
    देव बालाजीच्या नावा, मग सोयराच्या गावा .. (2 times)

    लगीन एवढी चिठ्ठी दिली जोतिबा देवाईला
    दिली जोतिबा देवाईला, दिली जोतिबा देवाईला
    लगीन एवढी चिठ्ठी दिली जोतिबा देवाईला
    मग नवऱ्याच्या बाबा आईला,
    नवऱ्याच्या बाबा आईला ...
    दिली जोतिबा देवाईला, मग नवऱ्याच्या बाबा आईला ...

    * * * *

    (((( 6 ))))

    मांडवाच्या दारी माझं धुराने भरलं डोळ
    धुरानं भरलं डोळं ....
    माझं धुरानं भरलं डोळा
    मांडवाच्या दारी माझं धुराने भरलं डोळ
    बंधू च्या लग्नात जरी पातळ पायघोळ ...

    मांडव घातीला सारा मांडव दवण्याचा
    सारा मांडव दवण्याचा..
    सारा मांडव दवण्याचा..
    मांडव घातीला सारा मांडव दवण्याचा
    लगीन करायाचं छंद नवऱ्याच्या मेवणीचा
    लगीन करायाचं छंद नवऱ्याच्या मेवणीचा

    मांडवाच्या दारी का ग वर माय काळी मोरी
    का ग वर माय काळी मोरी
    का ग वर माय काळी मोरी
    मांडवाच्या दारी का ग वर माय काळी मोरी
    तुझ्या बंधुच्या आहेराचा बाजा होतोय शिव वरी
    तुझ्या बंधुच्या आहेराचा बाजा होतोय शिव वरी

    हळद एवढं कुंकू देवी भवानी पाठयीवा
    देवी भवानी पाठयीवा ...
    देवी भवानी पाठयीवा
    हळदी एवढं कुंकू देवी भवानी पाठयीवा
    मग नवरा नटयीवा . मग नवरा नट यीवा
    देवा भवानी पाठयीवा मग नवरा नटयीवा

    मांडव घातिला सारा मांडव चाफ्याचा
    सारा मांडव चाफ्याचा... सारा मांडव चाफ्याचा
    मांडव घातिला चारा मांडव चाफ्याचा
    लगीन करायचं छंद नवरीच्या बापयाचा
    लगीन करायचं छंद नवरीच्या बापयाचा

    मांडव घातिला सारा मांडव तुझ्या जाईचा
    सारा मांडव जाईचा ... सारा मांडव जाईचा....
    मांडव घातिला सारा मांडव तुझ्या जाईचा ..
    लगीन करायचं छंद नवऱ्याच्या आईचा ....
    लगीन करायचं छंद नवऱ्याच्या आईचा ....

    मांडव घातीला सारा वेणीयीचा
    सारा वेणीयीचा ... सारा वेणीयीचा
    मांडव घातीला सारा वेणीयीचा
    लगीन करायचं छंद नवऱ्याच्या बहिणीचा
    लगीन करायचं छंद नवऱ्याच्या बहिणीचा

    मांडवाच्या दारी दुरडी सुकली पानायाची
    दुरडी सुकली पानायाची ....
    दुरडी सुकली पानायाची ...
    मांडवाच्या दारी दुरडी सुकली पानायाची
    त्याची माता माऊली मानायाची
    माता माऊली मनायाची ..
    दुरडी सुकली पानायाची ... माता माऊली मनायाची ..

    मांडवाच्या दारी हळदी बाईचा पाट केला
    हळदी बाईचा पाट केला ..
    हळदी बाईचा पाट केला ...
    मांडवाच्या दारी हळदी बाईचा पाट केला
    नवरा लिंबाचं पाणी न्हाला ..
    नवरा लिंबाचं पाणी न्हाला ...
    हळदी बाईचा पाट केला ...नवरा लिंबाचं पाणी न्हाला ...

    मांडवाच्या दारी कोण वरमाय पाय धूती
    कोण वरमाय पाय धूती
    कोण वरमाय पाय धूती
    नवऱ्या बाळाजीची तिची चुलती मान घेती
    नवऱ्या बाळाजीची तिची चुलती मान घेती

    वर माय एवढ व्हावं आई बापयं असताना
    आई बापयं असताना ...आई बापयं असताना..
    वर माय एवढ व्हावं आई बापयं असताना
    बेंड मांडवी वाजयीतो मोर पैठणी नेसताना
    बेंड मांडवी वाजयीतो मोर पैठणी नेसताना

    * * * *


    हे पण नक्की वाचा 👇👇👇

    तर मित्रांनो, आज या पोस्टमध्ये आपण Lagnachi Gani Marathi Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

    पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.