उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला Lyrics | Ubha Vitevari Majha Pandurang Rahila
नमस्कार या पोस्टमध्ये उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला Lyrics बघणार आहोत.
सॉंग - विटेवरी उभा माझा पांडुरंग राहिला
सिंगर - पायल कांबरी
लिरिक्स / म्युझिक - मनोज भोले
_____________________
🌷उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला Lyrics 🌷
होई समाधान माझा जाता पंढरीला
उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला..|| धृ ||
तुळशीची माळ घातली गळा मी
तुझ्या नावाचा रे देवा लावला टिळा मी
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल सखा पांडुरंग...
तृप्त झालं मन माझं येता रे वारीला...
उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला..|| १ ||
टाळ चिपळ्या नं मृदुंग हा वाजतो
देवाचिये द्वारी भक्त क्षणभर थांबतो
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल सखा पांडुरंग..
दिंड्या पताका देवा भिडती नभाला..
उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला..|| २ ||
विठू रखुमाई माझे मायबाप
पांडुरंग हरी तुझा लावियेला जाप
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल सखा पांडुरंग..
घडत तुझी वारी लोटांगण चरणाला
उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला..|| ३ ||
* * * * * * *
_____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग Lyrics
- विठ्ठल म्हणे रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी Lyrics
- तुळशीला पाणी घालते रोज सकाळी Lyrics
- भक्तीची वाट आम्हा संतांनी दावली Lyrics
_____________________
आज या पोस्टमध्ये आपण उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला Lyrics बघितले.
📑📑पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
_____________________
Post a Comment