Header Ads

तुळशीला पाणी घालते रोज सकाळी Lyrics | Tulashila Pani Ghalate Roj Pani



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण तुळशीला पाणी घालते रोज सकाळी Lyrics बघणार आहोत.
___________________________

🌳तुळशीला पाणी घालते रोज सकाळी Lyrics 🌳


सौभाग्याचं लेणं मी लावते कपाळी
तुळशीला पाणी घालते रोज सकाळी || धृ ||

या तुळशीला घालून पाणी
पाणी घालून गेली जनी
सौभाग्याचं लेणं मी लावते कपाळी .. || १ ||

या तुळशीला लावून कुंकू
कुंकू लावून गेली सखू
सौभाग्याचं लेणं मी लावते कपाळी .. || २ ||

या तुळशीला लावून गंध
गंध लावून गेले मुकुंद
सौभाग्याचं लेणं मी लावते कपाळी .. || ३ ||

या तुळशीला लावून अबीर
अबीर लावून गेले कबीर
सौभाग्याचं लेणं मी लावते कपाळी .. || ४ ||

या तुळशीला लावून बूका
बूका लावून गेले तूका
सौभाग्याचं लेणं मी लावते कपाळी .. || ५ ||

* * * * *
___________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
___________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण तुळशीला पाणी घालते रोज सकाळी Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!

___________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.