Sakhu Marathi Song Lyrics | Brmha | Sonali Sonawane | सखू
नमस्कार या पोस्टमध्ये आपण Sakhu Marathi Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग्स - सखु
लिरिक्स - ब्रह्मा, चैतन्य देवरे
सिंगर - सोनाली सोनवणे, ब्रह्मा
म्युझिक - ब्रह्मा, राहुल दलकरी
म्युझिक लेबल - भैरवा फिल्म
________________
👩Sakhu Marathi Song Lyrics👩
सखू माझी सखू असं नको बघू
मला जायचंय कामावर सांजच्याला भेटू
बघतोय मी बघतच राहू का ?
तू किती देखणी तुलाच पाहू का ?
गोरी गोरी पान आहे माझी छान तू
रविवार येतोय पिक्चरला नेऊ का ?
नजरेचा बाण दिलाच ताणून
काळजावर तुझ्याच नावाचं पान
आरशाला टिकली टिकलीचा मान
पाहून तुला माझं सुटलया भान
सांजच्याला सोबत जेवायला बसू..
सखू माझी सखू अगं असं नको बघू
मला जायचंय कामावर सांजच्याला भेटू..
सखू.. अग सखू...
सखु... अग सखु...
धनी अहो धनी नका जाऊ तुम्ही
मी मस्तानी अन बाजीराव तुम्ही
नाकात नथ माझी अंग थोडं जळू दे..
नको गं सखू मला कामावर पळू दे...
नेहमीच काम आज बाजूला राहू दे..
नको अगं सखू आज मला जाऊ दे..
येते मी प्रेमान झाले मी बेभान
या जवळ वेगानं बघा तरी किमान
बघायचा कार्यक्रम बाजूला राहू दे
आता माझी वेळ झाली नोकरीवर जाऊ दे
धनी माझा धनी ऐका ना हो तुम्ही..
जाऊ नका कामाला घरी राहू दोन्ही..
धनी माझा धनी ऐका ना हो तुम्ही..
जाऊ नका कामाला घरी राहू दोन्ही..
सखु...धनी..
अग सखू..अहो धनी..
सखु धनी
अगं सखू... अहो धनी..
सखु... बोला ना काय ?
सखु.. बोला तरी !!!
अग सखु... जा तिकडं...
राग नको ठेवू असं नको पाहू
चहा घे बशी मध्ये दोघं मिळून पिऊ
घेतला हा पदर पदरचा काठ घे
कपाळाला कुंकू टोपीला साथ दे
सात जन्म तुमची मी..
हातात हात घे.. दिस जात नाही माझा..
अगं थोडा श्वास घे..
बांगड्यांची खनखन पायात पैजन..
वाढली माझ्या डोक्यात डोक्यात भणभण..
भणभण माझी सगळी आता मिटू दे...
सांजच्याला नको हौस आता फिटू दे..
सखु.. अग सखू..
धनी.. अहो धनी..
ये जवळ आता... दूर जावा तुम्ही..
सखु.. अग सखू..
धनी.. अहो धनी..
ये जवळ आता... दूर जावा तुम्ही..
सखू.. धनी..
अगं सखू... अहो धनी...
सखू.. धनी...
अगं सखू... अहो धनी...
* * * * * * *
______________
✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇👇
_______________________
👀आज या पोस्टमध्ये आपण Sakhu Marathi Song Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
_______________________
Post a Comment