मजला दर्शन द्या हो स्वामी प्रभू दत्ता Lyrics | Majala Darshan Dya Ho Swami Prabhu Datta
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण मजला दर्शन द्या हो स्वामी प्रभू दत्ता Lyrics बघणार आहोत. दत्तगुरुंचे खूपच सुंदर असे हे भक्ती गीत आहे.
__________________________
🍁मजला दर्शन द्या हो स्वामी प्रभू दत्ता Lyrics | Marathi 🍁
मजला दर्शन द्या हो स्वामी प्रभू दत्ता
अहो गुरुदत्ता...
तुमच्या चरणी ठेवितो माथा कृपा करावी आता
मजला दर्शन द्या हो स्वामी प्रभू दत्ता
अहो गुरुदत्ता...|| धृ ||
बालपण माझे अज्ञानात गेले
काम क्रोध विषयी तारुण्य रंगले
क्षमा करावी आता
मजला स्वामी दीनानाथा
मजला दर्शन द्या हो.. || १ ||
गेली वेळ देवा आला रे पछतावा
म्हातारपणी तुजविण कोण मज देवा
काही सूचना आता मजला स्वामी कृपावंता
मजला दर्शन द्या हो.. || २ ||
चंचल मन हे माझे नाही रे ठिकाणी
जन्मा घेऊन या कष्ट सोसले नाना
पदरी धरा हो अज्ञानाला तुम्ही मोक्षदाता
मजला दर्शन द्या हो.. || ३ ||
दासबोध गीर प्रार्थीतो तुजला
दत्त नाम सेवा द्यावी हो मजला
सर्व ठाई तुमची सत्ता चरणी ठेवितो माथा
मजला दर्शन द्या हो.. || ४ ||
* * * * * *
__________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- दत्त दत्त म्हणता नित्य Lyrics
- दत्ता अवधूता तुम्ही कधी हो येणार Lyrics
- गुरुदत्ता तू माय मी लेकरू Lyrics
- श्री दत्तांची भजने लिरिक्स मराठी मध्ये
__________________________
आज या पोस्टमध्ये आपण मजला दर्शन द्या हो स्वामी प्रभू दत्ता Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
__________________________
Post a Comment