Header Ads

ओटी अंबेची जगदंबेची भराना Lyrics | Oti Ambechi Jagdambechi Bhara Na



नमस्कार या पोस्टमध्ये आपण ओटी अंबेची जगदंबेची भराना Lyrics बघणार आहोत.

___________________________

ओटी अंबेची जगदंबेची भराना Lyrics


हिरव्या हिरव्या बांगड्या हाती भरा ना
ओटी आंबे ची जगदंबेची भरा ना..|| धृ ||

तुळजापूरची तुळजाभवानी कलकत्त्याची काली
कोराडी ची महालक्ष्मी साक्षात प्रगट झाली
हळद कुंकू माझ्या आईला लावा ना
ओटी अंबेची जगदंबेची भरा ना
हिरव्या हिरव्या बांगड्या हाती भरा ना...|| 1 ||

गंगा यमुना सरस्वती या तिघी बहिणी आल्या
अनुसयाच्या चरणावरती नतमस्तकच्या झाल्या
गंध अक्षदा बिल फुल वाहना
ओटी अंबेची जगदंबेची भरा ना
हिरव्या हिरव्या बांगड्या हाती भरा ना...|| 2 ||

हिरवे पातळ भरजरी अंगात चोळी
कुंकवाचा टिळा शोभतो आईच्या कपाळी
पायी मळवट आईला माझ्या लावा ना
ओटी अंबेची जगदंबेची भरा ना
हिरव्या हिरव्या बांगड्या हाती भरा ना...|| 3 ||

रत्नजडित सिंहासनी मूर्ती आज पाहिली
तुळजापूरची तुळजाभवानी स्वप्नामध्ये आली
खना नारळाने ओटी आईची भरा ना
हिरव्या हिरव्या बांगड्या हाती भरा ना...|| 4 ||

* * * * * *
___________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
_______________________


👀आज या पोस्टमध्ये आपण ओटी अंबेची जगदंबेची भराना Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!

___________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.