Header Ads

निज निज बाळा नको वाजवू रे खुळखुळा Lyrics | Nij Nij Bala Nako Vajvu Khlukhula



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण निज निज बाळा नको वाजवू रे खुळखुळा Lyrics बघणार आहोत.
________________________

🍭निज निज बाळा नको वाजवू रे खुळखुळा Lyrics 🍭

रुणझुण रुणझुण वाजती पैजन पायामध्ये वाळा
निज निज बाळा नको वाजवू रे खुळखुळा || धृ ||

सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी
झोका देते नानापरी
गाणे गाऊनी तुला हलविते लागू दे डोळा
निज निज बाळा नको वाजवू रे खुळखुळा || १ ||

नानापरी केला छंद इच्छा पुरविली बाळाची
केशर दूध आणि दुधात साखर लोण्याचा गोळा
निज निज बाळा नको वाजवू रे खुळखुळा || २ ||

एका जनार्दनी समरस गवळण हरी चरणाशी आल्या
हरी चरणाशी आल्या गवळणी लागू दे डोळा
निज निज बाळा नको वाजवू रे खुळखुळा || ३ ||

🔶 🔶 🔶 🔶
________________________

✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण निज निज बाळा नको वाजवू रे खुळखुळा Lyrics बघितले.

📝📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!!
________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.