मोरया बोला भक्तीत डोला Lyrics | Morya Bola Bhaktit Dola Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण मोरया बोला भक्तीत डोला Lyrics बघणार आहोत.
________________________
🌹मोरया बोला भक्तीत डोला Lyrics🌹
मोरया बोला भक्तीत डोला
गणपती आला आला आला
आला आला... || धृ ||
या ढोल ताशाच्या ठेक्यावरी
गौरी गजानन आला घरी
हा मोदक वाला हा उंदीर वाला
गणपती आला आला आला
आला आला... || १ ||
वाजत गाजत आली झाली मंगलमूर्ती
भक्तमंडळी सारे गुलाल उधळी वरती
गणेश चतुर्थी आले आनंदाची भरती
येई गणनायक हा नाचायाला स्फूर्ती
गणपती आला आला आला
आला आला... || २ ||
जमले भारत जन हे स्वागत करण्यासाठी
जय जय मंगलमूर्ती ज्याच्या त्याच्या ओठी
दर्शन घेण्यासाठी झाली गर्दी मोठी
कुठे वाचतो ताशा कुठेच नेतील काठी
गणपती आला आला आला
आला आला... || ३ ||
दूर्वा मोदक लाडू गणरायाला देऊ
गजाननाच्या चरणी माथा आपला ठेवू
आरती करून त्याची मंगल महिमा गाऊ
गणपती आला आला आला
आला आला... || ४ ||
✜-✜-✜-✜-✜-✜
________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_______________________
👀आज या पोस्टमध्ये आपण मोरया बोला भक्तीत डोला Lyrics बघणार आहोत.
📝📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💚💚💚 !!!!!
________________________
Post a Comment