गौराई ग आली Lyrics | Gauri Ganpati Geet Marathi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण गौराई ग आली Lyrics बघणार आहोत.
___________________________
🌻गौराई ग आली Lyrics | Marathi 🌻
हिरवा शालू नेसून बाई कुंकू कपाळी ल्याली
गणरायाला घेऊन संगे गौराई ग आली... || धृ ||
शालू जरीचा नेसून आली केला सुंदर शृंगार
लावण्य तिच किती देखणं जणू कसं नवसार
सौभाग्याचा लेणं कपाळी दुष्ट दिट ती कानी
गणरायाला घेऊन संगे गौराई ग आली... || १ ||
गौरी नंद गणरायाला गोड मोदकाचा घास
गौरीसाठी इष्ट मैत्रिणी थाटमाट तिचा खास
सडा रांगोळी रास फुलांची अशी तयारी झाली
गणरायाला घेऊन संगे गौराई ग आली... || २ ||
चांदीच्या या ताटामध्ये पुरणाचा घास
भरूनीया घास लाड पूरवावा खास
माहेरच्या अंगणात ठेवतीया आस
तिच्या पावलांनी आली सुखाची आस
गणरायाला घेऊन संगे गौराई ग आली... || ३ ||
§§§§§§§
__________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- मंगळागौरीची गाणी Lyrics
- आमच्या पप्पांना गणपती आणला अन मम्मीने गौरी बसवली Lyrics
- नवसाची गौरी माझी Lyrics
- आळवितो मी हे श्री गणा Lyrics | शक्ती तुरा मराठी
___________________________
आज या पोस्टमध्ये आपण गौराई ग आली Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💙💙💙 !!!!!!
___________________________
Post a Comment