आमच्या पप्पांना गणपती आणला अन मम्मीने गौरी बसवली Lyrics
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण आमच्या पप्पांना गणपती आणला अन मम्मीने गौरी बसवली Lyrics बघणार आहोत.
सॉंग - आमच्या पप्पांनी गणपती आणला आणि मम्मीने गौरी बसवली
लिरिक्स/म्युझिक - चंदन कांबळे
सिंगर - शिवानी शिंदे
__________________________
🌺आमच्या पप्पांना गणपती आणला अन मम्मीने गौरी बसवली Lyrics 🌺
|| गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया ||
बाप्पाला बांधलाय फेटा
अन देवीला साडी नेसवली
आमच्या पप्पांनी गणपती आणला
अन मम्मीने गौरी बसवली.. || धृ ||
गौरी गणपतीचा ग मान
पानाफुलांचा आरास छान
झाले सोहळ्यात सामील सारे
आणि गेले आनंदून
उंदीर मामा ने मोदक खाल्ला
सारीच मंडळी हसवली..
आमच्या पप्पांनी गणपती आणला..|| १ ||
नवरी बाईला घाट अन माठ
मांडला चौरंग आणि पाट
धूप दीपाचा लखलखाट
आरती कराया सजलाय ताट
असा काय आरास केला
जशी जिवंत मूर्ती सावली
आमच्या पप्पांनी गणपती आणला..|| २ ||
खेळ करूया मंगळागौरी
गौरी दिसाया जणू ती नवरी
तिचा साज शृंगार असा
पाहणारे बी झाले तर बावरी
मनोभावाने भक्ती चंदन
मूर्ती मनात ठसवली
आमच्या पप्पांनी गणपती आणला..|| ३ ||
❖ ❖ ❖ ❖ ❖
__________________________
✅हि भक्तीगीते पण नक्की वाचा 👇👇👇
__________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण आमच्या पप्पांना गणपती आणला अन मम्मीने गौरी बसवली Lyrics बघितले.
📑📑पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!!
__________________________
Post a Comment