गौरीची गाणी Lyrics मराठी | Gourichi Ganpatichi Gani Lyrics
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण गौरीची गाणी Lyrics बघणार आहोत. गौरीची खूपच सुंदर अशी गीते आपण इथे आज बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया गौरीच्या गाण्याचे बोल -
गौरीची गाणी Lyrics | Marathi
🙏🙏🌸🌸🌸🌸🙏🙏
आमची गौराई सजवा
आमची गौराई सजवा शालू पैठणी नेसवा
आमची गौराई सजवा शालू पैठणी नेसवा
हिरे मानकाचा हार गळ्या घालून बसवा
आमची गौराई सजवा शालू पैठणी नेसवा
आमची गौराई सजवा शालू पैठणी नेसवा
आमची गौराई आली लई साधी लय भोळी
तिला पानांचा ग शालू तिला फुलांची ग चोळी
आमची गौराई सजवा शालू पैठणी नेसवा
आमची गौराई सजवा शालू पैठणी नेसवा
आली ग बाई आज गवर माझ्या दारा
नव्या नवरीचा साज तिला घाला
आमची गौराई,
आमच्या गौरीचा देव्हारा जसा दरबारी थाट
आमच्या गौरीचा देव्हारा जसा दरबारी थाट
तिच्या नैवेद्याला करू पंचपक्वानाचे ताट
तिच्या नैवेद्याला करू पंचपक्वानाचे ताट
आमची गौराई सजवा शालू पैठणी नेसवा
आमची गौराई सजवा शालू पैठणी नेसवा
आमच्या गौरीचा निवारा झोपडीच्या छायेखाली
आमच्या गौरीचा निवारा झोपडीच्या छायेखाली
हिला जेवायला करू माया ममतेची पोळी
हिला जेवायला करू माया ममतेची पोळी
आमची गौराई
आमची गौराई
आली ग बाई आज गवर माझ्या दारा
नव्या नवरीचा साज तिला घाला
आली ग बाई आज गवर माझ्या दारा
नव्या नवरीचा साज तिला घाला
आमची गौराई
आमची गौराई
* * * * *
गौराई आली आपल्या घरा
चला ग बायांनो ओटी भरा
गौराई आली आपल्या घरा
चला ग बायांनो ओटी भरा
गौराई आली आपल्या घरा
सर्व जमूनी आरती म्हणा
नाचून गाऊन ही धुंद ही मना
नाचून गाऊन ही धुंद ही मना
निर्मळ मनानं वंदन करा
गौराई आली आपल्या घरा
या ग देवीचा वंसा करा
फुगड्या घालून फेरही धरा
असाच वाहू द्या भक्तीचा झरा
असाच वाहू द्या भक्तीचा झरा
गौराई आली आपल्या घरा
गौराई आली आपल्या घरा
गौराईचा जडला छंद,
देई संसारी सुख आनंद
देई संसारी सुख आनंद
स्वभाव मातेचा प्रेमळ खरा
गौराई आली आपल्या घरा
गौराई आली आपल्या घरा
हातात घाला पाटल्या गोठ
लावा गौरीला कुकाच बोट
लावा गौरीला कुकाच बोट
हरेंद्र भाऊला पाहू द्या जरा
गौराई आली आपल्या घरा
गौराई आली आपल्या घरा
चला ग बायांनो ओटी भरा
गौराई आली आपल्या घरा
गौराई आली आपल्या घरा
गौराई आली आपल्या घरा
* * * * *
गौरी गणपती सण आलाय
गौरी गणपती सण आलाय,
माहेरा आली बाय
गौरीच पूजन हाय
पार्वती माऊली सोन्याच्या पाउली
आज घराला आली हाय
गौरी गणपती सण आलाय
गौरी गणपती सण आलाय
गौरी पूजन हाय, महिमा वर्णावा काय
गणपती देवा सुखाचा ठेवा
आनंदी वर्षाव हाय
हो रांगोळी काढून अंगणी मी गौरीपूजन मांडते
ठेवून माथा गौरी चरणी, भाव मनाचा जोडते
आनंदाने त्या मैतरणीशी झिम्मा फुगडी खेळते
तांदळाची ओटी देवी गौरीसाठी
आज गौरी कृपेने कमी कशाची नाय
गौरी गणपती सण आलाय ... 2 times
हात शिरावर गणरायांचा देतोया वरदान तो
भाळावरती हळद-कुंकू सुवासिनीचा मान तो
भक्ती फळही देई आम्हाला,
गजमुख शक्तिमान तो
तू सुखकारक गणराज, अंतरी आमच्या विराज
गणपती देवा सुखाचा ठेवा, महिमा हा वर्णावा काय
गौरी गणपती सण आलाय ... 2 times
माहेरा आली बाय
गौरीच पूजन हाय
पार्वती माऊली सोन्याच्या पाउली
आज घराला आली हाय
* * * * *
गौरी आल्या सोन्याच्या पावली
गौरी आल्या सोन्याच्या पावली, गौरी आल्या
गौरी आल्या सोन्याच्या पावली
त्यांना ओवाळाया चला
चुडा हाती घालू चला,
चुडा हाती घालू चला,
खना नारळांनी ओटी चला भरुया ग
गौरी आल्या सोन्याच्या पावली, गौरी आल्या
गौरी आल्या सोन्याच्या पावली, गौरी आल्या
झिम झिम पोरी झिम्मा ग,
खेळ राहिला निम्मा ग
गौराई च्या संगे गं माहेरवाशीनी आल्यात ग
गणपतीची माय गं आल्या आपल्या घरात ग
जिम पोरी जिम कपाळाचं बिंग
बिन गेलं फूटून पोरी आल्या उठून
गौरी आल्या सोन्याच्या पावली, गौरी आल्या
गौरी आल्या सोन्याच्या पावली, गौरी आल्या
चला खेळूया फुगडी, जरा सांभाळ बुगडी
गौर लेन ग नटली लाज गाली ग चूरली
आज गौराईच्या संगे चला करू जागरण
फु बाई फु ... फुगडी फु
तुझ्या मनातलं नाव घे तू
पतीदेव बघतात कोपऱ्यात बसून
सईबाई लाजते पदरा आडून,
तुझी माझी फुगडी रंगली ग
मनाची भिंगरी झाली ग
फू फू फू
गौरी आल्या सोन्याच्या पावली, गौरी आल्या
गौरी आल्या सोन्याच्या पावली, गौरी आल्या
पोरी पिंगा ग पोरी पिंगा
पिंगा आलाय ग आज रंगात
पोरी ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं गौर नादावली
पोरी पिंगा ग पोरी पिंगा
नाव घे पोरी नाव घे त्याचं
इश्श.....
नाव घेऊ ... ऐका
बिल्लोरी घरा, पितळेची परात
परातीत ठेवलेत शेरभर गहू
नवरा नाही आला तर नाव कसं घेऊ
गौरी आल्या सोन्याच्या पावली, गौरी आल्या
गौरी आल्या सोन्याच्या पावली, गौरी आल्या
* * * * *
आली ग गौराई
आली ग गौराई आज सदनी,
आली ग गौराई ही
गणराय माहेरी सुवासिनी,
करी हिरवा चुडा घालूनी
आली ग गौराई आज सदनी,
आली ग गौराई ही
फुलो फळो घर सारे आशीर्वादे
सुख शांती दे आम्हा गौराई ये
डोळ्यात रवी शशी तेज उजळले
अपार करुणा तुझी
कुंकू माती भाग्य आज जागले ग,
पाऊले आली घरी
तन मन मंदिरा हे झाले पहा
हृदया लाभला हर्ष नवा
गौरीमाई गौरीमाई फुलली आज वदली
आली ग गौराई
आली ग गौराई आज सदनी,
आली ग गौराई ही
फुलो फळो घर सारे आशीर्वादे
सुख शांती दे आम्हा गौराई ये
सुख शांती दे आम्हा गौराई ये
तिन्ही लोकी दाटले तुझीच माया,
तुझेच तारे वारे
दया क्षमा शांती ही तुझीच रूपे
आम्ही तुझी लेकरे
पदरी घे ग गौरी माये
चरणी मन तुझ्या नित्य राहे
स्वर्ग पहा, स्वर्ग पहा उतरला आज
भूवरी आली ग गौराई ही
आली ग गौराई आज सदनी,
आली ग गौराई ही
फुलो फळो घर सारे आशीर्वादे
सुख शांती दे आम्हा गौराई ये
सुख शांती दे आम्हा गौराई ये
* * * * *
गौराई आली लेकीच्या घराला
गवराई आली लेकीच्या घराला
गवराई आली लेकीच्या घराला
सुख लागलं माझ्या जीवाला
सुख लागलं माझ्या जीवाला
चला पुजुया आदी मायेला,
आपल्या गौराई मातेला
चला पुजुया आदी मायेला,
आपल्या गौराई मातेला
गौराई आली लेकीच्या घराला,
आली ग, आली ग ....
माझ्या ग आईला फूटे मायेचा पाझर
मुला बाळांवरी ती धरिते पांघर
मुला बाळांवरी ती धरिते पांघर
अलाबल केली हित लागली,
माझ्या ग लेकराला
सुख लागलं माझ्या जीवाला
सुख लागलं माझ्या जीवाला
चला पुजुया आदी मायेला,
आपल्या गौराई मातेला
चला पुजुया आदी मायेला,
आपल्या गौराई मातेला
गौराई आली, गौराई आली
गौराई आली लेकीच्या घराला,
आली ग, आली ग ....
मारूनी दूष्टाला तिने मिळविला विजय
माझं ग सौभाग्य ती राखीते अक्षय
मारूनी दूष्टाला तिने मिळविला विजय
माझं ग सौभाग्य ती राखीते अक्षय
मळवट भारी तिच्या कपाळी माझ्या ग लाविला
सुख लागलं माझ्या जीवाला
सुख लागलं माझ्या जीवाला
चला पुजुया आदी मायेला,
आपल्या गौराई मातेला
चला पुजुया आदी मायेला,
आपल्या गौराई मातेला
गौराई आली, गौराई आली
गौराई आली लेकीच्या घराला,
आली ग, आली ग ....
आई आली हो घराला, सोन्याच्या पावलांनी
घर माझे हे भरलं ग सुख शांती आनंदानी
आई आली हो घराला, सोन्याच्या पावलांनी
घर माझे हे भरलं ग सुख शांती आनंदानी
आई माझी आली, इडा पिडा गेली सोडून घराला...
आई माझी आली, इडा पिडा गेली सोडून घराला...
सुख लागलं माझ्या जीवाला
सुख लागलं माझ्या जीवाला
चला पुजुया आदी मायेला,
आपल्या गौराई मातेला
चला पुजुया आदी मायेला,
आपल्या गौराई मातेला
गौराई आली, गौराई आली
गौराई आली लेकीच्या घराला,
सुख लागलं माझ्या जीवाला
सुख लागलं माझ्या जीवाला
चला पुजुया आदी मायेला,
आपल्या गौराई मातेला
चला पुजुया आदी मायेला,
आपल्या गौराई मातेला
गौराई आली, गौराई आली
चला पुजुया आदी मायेला...
चला पुजुया आदी मायेला ...
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- गणपतीची मराठी गाणी Lyrics
- Famous Marathi Bhajan Lyrics
- Amchya Pappani Ganpati Anala Lyrics
- Maza Bappa Kiti God Disto Lyrics
तर मित्रांनो आज या पोस्टमध्ये आपण गौरीची गाणी Lyrics बघितले. तुम्हाला ही गाणी कशी वाटली ते मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment