गणपतीच्या सणाला गौराई आली होती माहेराला Lyrics
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण गणपतीच्या सणाला गौराई आली होती माहेराला Lyrics बघणार आहोत.
_______________________
🌺गणपतीच्या सणाला गौराई आली होती माहेराला Lyrics🌺
गणपतीच्या सणाला ग
गौराई आली होती माहेराला ग
दीड दिवसाची रजा
न शंकर आला तिला नेवाला ग... || धृ ||
साथ घालीता मेहुणीला मेहुणी
पाहुणे तयार करा ग
तांब्या भरुनी पाणी आणावा
पाहूना बाई तो आला ग..
कापुराच्या करा आरत्या
शंकर समजावा गं
दह्या दुधाची करा भोजन
निघती सासुराला गं
विजयला पाडून चरण शंकर
भोले पार्वतीला ग
संपली दिड दिवसाची रजा
गौराई चालली आपूल्या घराला गं..
भेट घेता आईची गौराई
पाणी डोळा दाटला गं
पाय उचलता माहेरातून
जड झालं पाऊल गं
घेता निरोप आई बापाची
गौराई निघाली सासुराला ग
नंदीवर बैसूनी
शंकर निघाले कैलासाला गं
गणपतीच्या सणाला ग
गौराई आली होती माहेराला ग
दीड दिवसाची रजा
न शंकर आला तिला नेवाला ग... ||
❖ ❖ ❖ ❖ ❖
_______________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_______________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!
_______________________
Post a Comment