Header Ads

Ata Tari Deva Song Lyrics | आता तरी देवा l Adarsh Shinde l Sonali S



नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण Ata Tari Deva Song Lyrics बघणार आहोत.
आदर्श शिंदे आणि सोनाली सोनवणे यांनी हे गीत गायलेलं आहे‌.


सॉंग - आता तरी देवा
लिरिक्स - प्रशांत नक्ती
सिंगर - आदर्श शिंदे सोनाली सोनवणे
म्युझिक - प्रशांत नक्ती, संकेत गुरव
म्युझिक लेबल - सारेगामा इंडिया लिमिटेड


______________________________

🙏Ata Tari Deva Song Lyrics🙏


आर तिच्या मागं मागं
लागून हौस साऱ्या पुरवन
लागलो मी धंद्याला.. झालो कंगाल
लागलो भिकेला..
आता म्हणते ती .. विसरून जा मला

आरं मागु किती मी पुजू तुला देवा
कधी सांग बाजार तुला फुटणार हाय
बोलू कुणाला सांगू कुणाला
नशिबाचं दुखणं हे संपलं की नाय
कुणीतरी सांगा वाईचं सांगा ना
माझ्यात कमी अशी कसली र हाय

आता तरी देवा मला पावशील का ?
सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का ?
आता तरी देवा मला पावशील का ?
सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का ?

हे शाळेत डोनेशन लाच देऊन नोकरी
पैशांचा बाजार हाय समदीकड
नेत्यांना मिळतंय फाईव्ह स्टार जेवन
भेसळीचा राशन मातर गरिबाकड
भक्त उभा तासान तास लायनीत
चरण दर्शनाचा मान VIP कड

गुन्हे करून पैसेवाले सुटतात
माणुसकी झाली स्वस्त पैशापुढे
काम धंदा सोडून आपली तरुण पिढी
सोशल मीडियावर झक मारतात का ?

आता तरी देवा मला पावशील का ?
सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का ?
आता तरी देवा मला पावशील का ?
सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का ?

हाऊस राजा माझी तू पुरी करणार
सांग सारे सुख मला देशील ना..
रोज फिरायला घेऊन जाशील ना..
फोटो माझे प्यारे वाले काढशील ना..

हे तुझ्या या चालबाजी कळतात मला
गोड बोलून माझा खाली केलास खिसा
दादा तुझ्या झालो बरबाद मी
नाही परवडत तुझं प्रेम गं आता ...

आता तरी देवा मला पावशील का ?
सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का ?
आता तरी देवा मला पावशील का ?
सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का ?

※ ※ ※ ※ ※
______________________________


✅ही गीते पण नक्की वाचा 👇👇👇
______________________________

👀आज या पोस्टमध्ये आपण Ata Tari Deva Song Lyrics बघितले.

📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💙💙💙 !!!!!
______________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.