तुळस एक वृंदावनी कोणी लाविली Lyrics | Tulas Ek Vrundavani Koni Lavili
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण तुळस एक वृंदावनी कोणी लाविली Lyrics बघणार आहोत.
______________________________
🌿तुळस एक वृंदावनी कोणी लाविली Lyrics 🌿
तुळस एक वृंदावनी कोणी लाविली
वाऱ्याच्या झुळकेने हळूच डोलली || धृ ||
तुळशीला बाई करू ओटा
पाप जाईल चारी वाटा
तुळस एक वृंदावनी कोणी लाविली ..|| १ ||
तुळशीला बाई घालू पाणी
उतरूनी गेली कशी जनी
तुळस एक वृंदावनी कोणी लाविली ..|| २ ||
तुळशीला लावून हळदी कुंकू
उतरूनी गेली संत सखू
तुळस एक वृंदावनी कोणी लाविली ..|| ३ ||
तुळशीला लावून बाई बुका
कैलास आला गेले संत तुका
तुळस एक वृंदावनी कोणी लाविली ..|| ४ ||
* * * * * *
___________________________
✅हे अभंग पण नक्की वाचा👇👇👇
______________________________
👀आज आपण तुळस एक वृंदावनी कोणी लाविली Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!निरोप माझा जाऊनी सांगा Lyrics
______________________________
Post a Comment