हे तुझे रूप डोळे भरून पाहू दे Lyrics | He Tujhe Rup Dole Bharun Paah De
🙏🙏🙏नमस्कार आज या पोस्टमध्ये आपण हे तुझे रूप डोळे भरून पाहू दे Lyrics बघणार आहोत.
__________________________
🌷हे तुझे रूप डोळे भरून पाहू दे Lyrics 🌷
हे तुझे रूप डोळे भरून पाहू दे
पांडुरंगा तू चरणी मला राहू दे || धृ ||
तूच कैवारी माझ्या जीवाचा धनी
हेच समजून मी आलो तुझ्या मंदिरी
भावनांची फुले तव पदी वाहू दे
पांडुरंगा तू चरणी मला राहू दे
हे तुझे रूप डोळे भरून पाहू दे
पांडुरंगा तू चरणी मला राहू दे || १ ||
ना जीवनात केली मी सेवा तुझी
ना तुझ्या दर्शना देवा आलो कधी
आज आलो आता तुझे नाम गाऊ दे
पांडुरंगा तू चरणी मला राहू दे || २ ||
माया लाविली कोणी सदा दूर करी
या भक्तांची हे जग बघू दे तरी
भक्ती भावाने मजला या जगी राहू दे
पांडुरंगा तू चरणी मला राहू दे || ३ ||
§ § § § §
__________________________
- पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला गीत
- विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला Lyrics
- मोजता येत नाही जगाच्या मापन Lyrics
- सावळ्या विठ्ठला तुझे रे मला वेड लागले Lyrics
__________________________
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!!!
__________________________
Post a Comment