Header Ads

ओवाळीते शंकराला सांज सकाळी Lyrics | Ovalite Shnakrala Saanj Sakali



नमस्कार या पोस्टमध्ये आपण ओवाळीते शंकराला सांज सकाळी Lyrics बघणार आहोत.
_________________________________________

ओवाळीते शंकराला सांज सकाळी Lyrics

सौभाग्याचे कुंकू लावूनी कपाळी
ओवाळीते शंकराला सांज सकाळी || धृ ||

धन नको दौलत नको नको मला काही
सौभाग्याचे कुंकू देवा जन्मभर राही
सौभाग्याचे कुंकू लावूनी कपाळी... || १ ||

तुजविण भोलेनाथा मला नाही कोणी
रावणाला आत्मलिंग दिले तू काढूनी
सौभाग्याचे कुंकू लावूनी कपाळी...|| २ ||

दैन्य दुःख सारे देवा तू निवारी
वाहते मी शंकराला बेल त्रिदळी
सौभाग्याचे कुंकू लावूनी कपाळी... || ३ ||

* * * * * *
_________________________________________


हे भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇

_________________________________________

आज या पोस्टमध्ये आपण ओवाळीते शंकराला सांज सकाळी Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!🙏🙏🙏🙏

_________________________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.