भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही Lyrics | Shiv Shankar Bhajan
नमस्कार या पोस्टमध्ये आपण भोले तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ति नाही Lyrics बघणार आहोत.
_________________________
भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही Lyrics
भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही
ओम नमः शिवाय हा मंत्र दिला
मी कधीच भूलणार नाही || धृ ||
पायी पायी चालत आलो
आलो या नगरात
आलो या नगरात देवा गंगासागरात
गोकर्णाचे फुल मी
तुला अजून वाहिलं नाही
ओम नमः शिवाय हा मंत्र दिला... || १ ||
गडावर गड देवगड तुझी बारा
नंदी गडावर देवा नाही लागला सहारा
गळ्यात शेषनाग मी कधीच पाहिला नाही
ओम नमः शिवाय हा मंत्र दिला... || २ ||
काशी केली मथुरा केली केली अमरनाथ
केले घृष्णेश्वर देवा तरी मी अनाथ
त्रिशूल डमरू वाला मी कधीच पाहिला नाही
ओम नमः शिवाय हा मंत्र दिला... || ३ ||
पायी पायी चालत आलो परळी वैजनाथ
आलो भुयारात देवा आनंद मनात
भोळा भगत देवा मी कधीच पाहिला नाही
ओम नमः शिवाय हा मंत्र दिला... || ४ ||
* * * * *
________________________
___________________________
आज या पोस्टमध्ये आपण भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!
___________________________
Post a Comment