आईचा मावळला आधार अभंग Lyrics | Aicha Mavlala Adhar
नमस्कार या पोस्टमध्ये आपण आईचा मावळला आधार अभंग Lyrics बघणार आहोत.
_____________________
आईचा मावळला आधार अभंग Lyrics
आई वाचूनी पोर वेगळे
तुटले नाते पार
आईचा मावळला आधार... || धृ ||
खेळविले तू तुझ्या कुशीत
वात्सल्याचा प्रेम भरात
आई दिसेना घरी न दारी
आस कशी धरणार
आईचा मावळला आधार... || १ ||
भोळ्या जीवाचे गुंफुनी जाळे
कशी टाकुनी गेलीस बाळे
बाळावरती का रुसलीस
अनंत तुझे उपकार
आईचा मावळला आधार... || २ ||
तुझ्या प्रीतीचे स्वप्न पडले
उचक्यांचे काहूर उठले
आई आई हाका मारी
परतूनी कधी येणार
आईचा मावळला आधार... || ३ ||
___________________________
हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇👇
___________________
आज या पोस्टमध्ये आपण आईचा मावळला आधार अभंग Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏
_____________________
Post a Comment