Header Ads

जावई रुसल्यान गो Song Lyrics | Jawai Ruslyan Go



नमस्कार या पोस्टमध्ये आपण जावई रुसल्यान गो Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - जावई रुसल्यान गो
लिरिक्स - सुजित, विराज
सिंगर - परमेश माळी
म्युझिक - सुजित, विराज



जावई रुसल्यान गो Song Lyrics | Marathi

मामी चा भाचा मोया बसला
आत्याचा भाचा मोया बसला
आजीचा नातू मोया बसला
आईचा लेक मोया बसला
जावई रुसल्यान गो
रुसल्यान गो हलदीला....
जावई रुसल्यान ग
रुसल्यान गो हलदीला....

हे वारा झाला ना मामी बोलवा
वारा घाला ना काकी बोलवा
वारा घाला ना मावशी बोलवा
वारा घाला ना आत्या बोलवा
लाडाचा लेक आज बैसला
कौतुक होयला हो
लाडाचा लेक आज बैसला
कौतुक होयला हो

येती त्याच्या माया मावश्या
घालती पालवी वारा गं
येती त्याच्या माया मावश्या
घालती पालवी वारा गं

बँड बाजा ह्ये वाजू लागला
गणगोत सारा नाचू लागला
मामा ह्यो हळदीन पिसाळ झाला
मामीला घेऊन नाचू लागला
आर मागल्या दारानं दारूचा पाट
तरीबी जावई बघतय वाट
आर खबर लागली सासुर्याला

जावई रुसल्यान गो
रुसल्यान गो हलदीला....
जावई रुसल्यान गो
रुसल्यान गो हलदीला....

आरं जावयाची काय सांगावी तऱ्हा
डोक्यावर घेतलाय मांडव सारा
पाठीवर कचकच फिरवी सुरा
हे कामावर झोपलाय गडी ह्ये खरा

हे हातावर त्याच्या दिलय पान
सासुराचा तो राखून मान
ईसरून रागाला उत्कन हसला

जावई रुसल्यान गो
रुसल्यान गो हलदीला....
जावई रुसल्यान गो
रुसल्यान गो हलदीला....

मान दिला सग्या सोयऱ्याला
कमी पडली जावयाला
हळदीन पुरा हा मागून गेला
थकून भागून जेवायला आला
आरं मटण सारा खपून गेला
पातेला पुरा रिकामा झाला
अरे याच्या वाट्याला बटाटा ह्यो आला..

जावई रुसल्यान गो
रुसल्यान गो हलदीला....
जावई रुसल्यान गो
रुसल्यान गो हलदीला....

अरे फूसू फूसू करतय सासुबाई
जावयाचा या कराच काय ?
लेकीच्या माझ्या नशिबाला,
रागाचा कोंबडा भेटला हाय...

जावई नुसता किरकिर करी
जावई नाचतोय वरचे वरी
अरे जावयाला घेतला खांद्यावरी
जावयाची केली हौस पुरी
रुबाब त्याचा न भलताच थाट
मधीच करतोय कॉलर ताठ...
आर पाय घसरून भुईवर आपटला...

जावई रुसल्यान गो
रुसल्यान गो हलदीला....
जावई रुसल्यान गो
रुसल्यान गो हलदीला....




हि गिते पण नक्की वाचा 👇👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण जावई रुसल्यान गो Song Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.