Header Ads

प्राणसई कविता ( इयत्ता अकरावी ) | Pransai Kavita Iyatta Akaravi


नमस्कार, या पोस्टमध्ये आपण प्राणसई कविता बघणार आहोत. इयत्ता अकरावीच्या कुमारभारती या पाठ्यपुस्तकांमध्ये ही कविता अभ्यासाला आहे. इंदिरा संत (१९१४-२०००) या कवितेच्या कवियत्री आहेत. उन्हाळा संपत आलेला आहे आणि घरात शेतामध्ये पाऊस येण्यापूर्वीची तयारी झाली आहे. अशावेळी पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन कवियत्रीने कवितेतून मेघांना मैत्रिणी या नात्याने केले आहे. प्रस्तुत कवितेत कवियत्रीने पावसाला येण्यासाठी आळवणी केली आहे.

प्राणसई कविता

पीठ कांडते राक्षसी
तसे कडाडते ऊन
प्राणसई घनावळ
कुठे राहिली गुंतून ?

दिला पाखरांच्या हाती
माझा सांगाया धाडून
ये ग ये ग घनावळी
मैत्रपण आठवून

पडवळ- भोपळ्यांची
आळी ठेविली भाजून
हुडा मोडून घरात
शेणी ठेविल्या रचून

बैल झाले खान बंदी ठाणबंदी
झाले मालक बेचैन
तोंडे कोमेली बाळांची
झळा उन्हाच्या लागून

विहिरीच्या तळी खोल
दिसू लागले ग भिंग
मन लागेना घरात
कधी येशील तू सांग ?

ये ग दौडत धावत
आधी माझ्या शेतावर
शेला हिरवा पांघर
मालकांच्या स्वप्नावर

तशी झुलत झुलत
ये ग माझीया घराशी
भाचे तुझे झोंबतील
तुझ्या जरीच्या घोळाशी

आळे वेलाचे भिजू दे
भर विहीर तुडुंब
सारे घरदार माझे
भिजू दे ग चिंब चिंब

उभी राहून दारात
तुझ्या संगती बोलेन
सखा रमला शेतात
त्याचा कौतुक सांगेन

का ग वाकुडे पणा हा
का ग अशी पाठमोरी
ये ग ये ग प्राणसई
वाऱ्यावरून भरारी

- इंदिरा संत



हे पण वाचा 👇👇👇


तर आज आपण या पोस्टमध्ये प्राणसई कविता बघितली.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.